शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: टोपमधील ३७ विनापरवाना क्रशर सील, सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच 'महसूल'ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:55 IST

अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

शिरोली : हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी येथे बेकायदेशीररीत्या सुरू असलेले ३७ क्रशर व्यावसाय सील करून तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवारी दिवसभर धडक कारवाई केली.बुधवारी (दि. ९) आमदार सतेज पाटील यांनी टोप-कासारवाडी परिसरातील अवैध उत्खनन व शासनाकडे जमा होणारा महसूल याबाबतचा तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाचा महसूल चुकवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये गुरुवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यावर टोप, कासारवाडी येथील खाण व क्रशर व्यवसाय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.मंत्री बावनकुळे यांनी अनधिकृत उत्खनन करणाऱ्या दगड खाणी, क्रशरवर कारवाई करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी सीमा मोरया, पांडुरंग धुमाळ, अमित लाड, सचिन कांबळे, अमोल कोटे यांच्या पथकाने धडक क्रशर सिलची कारवाई केली.

वाचा- होय..! हेलिकॉप्टर घेतलंय; रॉयल्टी बुडवून नाही तर कर्ज काढून; सतेज पाटलांच्या आरोपानंतर व्यावसायिकाने दिले स्पष्टीकरणटोप आणि कासारवाडी येथील ४६ पैकी ३७ व्यावसायिकांनी ट्रेडिंग परवानाच काढलेला नाही. तसेच कित्येकांच्याकडे प्रदूषण महामंडळाचे परवानगी पत्रच नाही. दगड उत्खनन करणाऱ्या अनेकांनी राॅयल्टी भरलेली नाही, कित्येक जण विनापरवाना, विनाराॅयल्टी उत्खनन करत आहेत अशांवर कारवाई सुरू करून हे क्रशर सील केले आहेत, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणलेअनधिकृत दगड खाण व क्रशरवर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर मोठी हालचाल पाहायला मिळाल्या. कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी डंपर, जेसीबी, पोकलेनसारखी अवजड यंत्रसामग्री इतरत्र हलवली. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता मंडलाधिकारी तलाठी कोतवाल यांना विनापरवाना आणि अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश दिले त्यानुसार गुरुवारी दिवसभर टोपमधील ३७ क्रशरवर कारवाई करण्यात आली.

तहसीलदार यांच्या आदेशानुसार, ज्या क्रशर व्यवसायिकांकडे ट्रेडिंग लायसन प्रदूषण महामंडळाचा परवाना बिगर शेती रॉयल्टी भरलेली नाही अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून, टोपमधील ४६ पैकी ३७ व्यावसायिक परवाना नाही तर ९ जणांकडे परवाना आहे. - सीमा मोरया, मंडलाधिकारी