शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कोरोना लसीचे ३७ हजार डोस झाले मुदतबाह्य, नव्याने २० हजार डोसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 17:08 IST

बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांची टाळाटाळ

कोल्हापूर : कोरोनाचे गांभीर्य संपल्यानंतर बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील ३७ हजार डोस ३१ डिसेंबर २०२२ रोजी मुदतबाह्य होणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मागणी वाढणार आहे हे लक्षात घेऊन नव्याने कोविशिल्डच्या २० हजार डोसची मागणी नोंदवण्यात आली आहे.जिल्ह्यातील ३३ लाख ४३ हजार ४९० नागरिकांनी पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे हे नियोजन करण्यात आले होते. यातील पात्र ९० टक्के नागरिकांना पहिला डोस, तर ८० टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. मात्र, केवळ पाच टक्के नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला.आता कोरोनाचा कहर पुन्हा काही देशांमध्ये सुरू झाल्यामुळे लसीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. नागरिक बूस्टर डोससाठी चौकशी करत आहेत. परंतु, ३१ डिसेंबरच्या आतच हा डोस घ्यावा लागणार आहे. कारण त्यानंतर सर्व डोस मुदतबाह्य होणार आहेत. यानंतर नागरिकांनी पुन्हा डोस मागितल्यास गैरसोय नको म्हणून नव्याने २० हजारची मागणी नोंदवण्यात आली असून, नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात हे डोस उपलब्ध होणार आहेत.जनजागरण आवश्यककोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेताना आरोग्य विभागातील कर्मचारीही टाळाटाळ करत होते ही वस्तुस्थिती होती. परंतु, जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने याबाबत जनजागरण करून लसीकरणाची टक्केवारी वाढवली. मात्र, बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांनी टाळाटाळ केली. आता जरी काही डोस मुदतबाह्य होणार असले, तरी २० हजार कोविशिल्डची मागणी नोंदवली आहे. त्यामुळे नागरिकांना नव्या वर्षात हा डोस उपलब्ध होईल. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस