शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यावर निरीक्षणात आढळल्या ३७ पक्ष्यांच्या प्रजाती, बर्डस ऑफ कोल्हापूरच्या हिवाळी मोहिमेस प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 19:02 IST

आठ स्थलांतरित, दोन स्थानिक स्थलांतरित आणि २७ रहिवासी पक्ष्यांच्या एकूण ३७ प्रजातींची नोंद

कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे बर्ड्स ऑफ कोल्हापूर या कोल्हापुरातील पक्षिप्रेमी संस्थेने पक्षी सप्ताहात पक्षी निरीक्षणाच्या हिवाळी मोहिमेची सुरुवात केली आहे. पन्हाळगडावरील पक्षी निरीक्षणात निरीक्षकांना आठ स्थलांतरित, दोन स्थानिक स्थलांतरित आणि २७ रहिवासी पक्ष्यांच्या एकूण ३७ प्रजातींची नोंद करता आली. सामान्यत: या महिन्यात दरवर्षी बाहेरून येणारे पक्षी अद्याप आढळले नसल्याचे पक्षी निरीक्षकांनी सांगितले आहे.आरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसापासून म्हणजे ५ नोव्हेंबरपासून बर्डमॅन ऑफ इंडिया सलीम अली यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे १२ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रभर ‘पक्षी सप्ताह’ सर्व निसर्गप्रेमी अतिशय उत्साहाने साजरा करतात. यानिमित्ताने बर्ड्स ऑफ कोल्हापूर या संस्थेने पक्षी निरीक्षणाच्या हिवाळी मोहिमेची सुरुवात केली आहे. या पक्षी निरीक्षणाची सुरुवात पन्हाळा गडावरील तबक उद्यानातून करण्यात आली. संस्थेचे प्रणव देसाई, सतपाल गंगनमाले, अभिषेक शिर्के आणि पृथ्वीराज सरनोबत यांनी या निरीक्षणात सहभाग घेतला.

पक्ष्यांच्या ३७ प्रजातींची नोंद :

  • - स्थलांतरित ८
  • - स्थानिक स्थलांतरित २
  • - रहिवासी २७

हे पक्षी आढळले :- स्थलांतरित पक्षी : बुटेड वॉब्लर, ब्लिथस् रीड वॉब्लर, ग्रीन वॉब्लर, व्हरडीटर फ्लायकॅचर, ब्लू कॅप रॉकथ्रश, कॉमन रोजफींच, फॉरेस्ट वॅगटेल, ऍशी ड्रोंगो- स्थानिक स्थलांतरित पक्षी : इंडियन पॅराडाइज फ्लायकॅचर आणि व्हाइट रंप शामा.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा वातावरण बदल, आधुनिक विकासासाठी चालू असलेल्या मानवी हस्तक्षेपाचे परिणाम पक्ष्यांच्या आढळावर दिसून येत आहेत. पक्षी निरीक्षण म्हणजे एक प्रकारचे मेडिटेशन आहे. यामुळे तणावमुक्त व उत्साही राहता येते. - प्रणव संजय देसाई, पक्षी निरीक्षक.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर