शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

‘एमपीएससी’ च्या परिक्षेला कोल्हापुरातील तब्बल ३५३२ उमेदवार गैरहजर!

By संदीप आडनाईक | Updated: April 30, 2023 19:29 IST

जिल्ह्यातील ७१ केंद्रांमध्ये १९,१७० उमेदवारांनी दिली परीक्षा

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी रविवारी कोल्हापुर जिल्हयातील ७१ उपकेंद्रांमध्ये घेण्यात आलेली ही परीक्षा १९ हजार १७० उमेदवारांनी दिली. तब्बल ३ हजार ५३२ उमेदवार या परिक्षेला गैरहजर राहिले. ही परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडली.

कोल्हापूर शहरातील ७१ उपकेंद्रांमध्ये सकाळी ११ ते १२ या वेळेत ‘एमपीएससी’ची परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी जिल्हयातील एकूण २२ हजार ७०२ उमेदवार बसले होते. त्यापैकी १९ हजार १७० उमेदवारांनी परीक्षा केंद्रांमध्ये उपस्थित राहून परीक्षा दिली. ही टक्केवारी ८४.४४ इतकी होती. उर्वरित ३ हजार ५३२ उमेदवार मात्र परिक्षेला गैरहजर होते. 

या परिक्षेसाठी ७१ केंद्रप्रमुखांसह १०२५ समवेक्षक, ३७७ पर्यवेक्षक आणि १८ समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. एकूण २२९३ अधिकारी आणि ५६० चतुर्थ श्रेणी कर्मचारी या परीक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक म्हणून भगवान कांबळे यांनी काम पाहिले. तीन भरारी पथकांनी काही परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. 

परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम

परीक्षा कालावधीत पोलीस विभागामार्फत परीक्षा केंद्रांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त होता. परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार होऊ नये व परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-ब सेवा संयुकत  पुर्व परीक्षा- २०२३

एकूण उपकेंद्र संख्या : ७१एकूण परीक्षार्थी :  २२७०२उपस्थित परीक्षार्थी : १९१७०टक्केवारी : ८४.४४ %अनुपस्थित परीक्षार्थी : ३५३२एकूण समन्वय अधिकारी : १८एकूण भरारी पथक : ०३एकूण नियुक्त  अधिकारी व कर्मचारी : २२९३

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Educationशिक्षणMPSC examएमपीएससी परीक्षाkolhapurकोल्हापूर