शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एक वर्ष आधीच; ही कुठली पद्धत?, इतिहास संशोधकांचा सवाल

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 2, 2023 13:54 IST

राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे

इंदुमती गणेशकोल्हापूर : पुढच्यावर्षी मेमध्ये लोकसभा निवडणूक, राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे. आजवरच्या इतिहासात कोणत्याही महापुरुषांची जयंती, राज्याभिषेक किंवा पुण्यस्मरणाचे कार्यक्रम त्यावर्षीपासून साजरे केले जात असताना यंदा फक्त राजकारणासाठी एक वर्ष आधीच त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणारे सरकारचे गणित कच्चे आहे की मेथड चुकली, अशी विचारणा इतिहास संशोधकांनी केली आहे.स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिन. यादिवशी स्वराज्याला, रयतेला राजा मिळाला म्हणूनच दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या जल्लोषात रायगडावर साजरा होतो. त्यासाठी हजारो मावळे रायगडावर दाखल होतात. यंदाचा हा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन असताना शासनाकडून ३५०वा सोहळा म्हणून चुकीचे मार्केटिंग केले जात आहे.६ जूनला काय करणार?दरवर्षी ६ जूनला हा सोहळा होत असतो; पण आज शुक्रवारी पंतप्रधानांची वेळ आहे म्हणून तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. मग ६ जूनला काय करणार? दाेन वेळा शिवराज्याभिषेक करणार का? हे प्रश्न आहेत. हा सगळा खटाटोप फक्त पुढच्यावर्षीच्या निवडणुकांसाठी केला जात असल्याने इतिहास संशोधक व शिवप्रेमींमध्ये असंतोष आहे.

ही कुठली पद्धत म्हणायची?शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. तेव्हापासून २०२३ पर्यंतची तारीख विचारात घेतली तर यंदाचा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन आहे. पुढच्यावर्षीचा म्हणजे २०२४ सालचा शिवराज्याभिषेक दिन ३५०वा असणार आहे.

याआधीचे महापुरुषांचे उत्सव

  • शिवराज्याभिषेक दिनाचा त्रिशतकोत्सव १९७४ साली साजरा झाला. त्यावेळी रायगडावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी गेल्या होत्या. कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणुका निघाल्या होत्या. शासनाच्या लोकराज्य मासिकामध्ये याची छायाचित्रे व वर्णन आहे.
  • शिवाजी महाराजांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव १९२७ साली साजरा झाला.
  • शिवाजी महाराजांचा ३००वा पुण्यस्मरण १९८० साली झाला.
  • राजर्षी शाहू महाराजांचा जन्मशताब्दी उत्सव १९७४ साली झाला.
  • शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्ष ६ मे २०२२ साली सुरू झाले व २०२३ साली संपले.

राजकारणासाठी आणि निवडणुकांसाठी ३४९व्या शिवराज्याभिषेक दिनाचा, इतिहासाचा सरकारकडून खेळखंडोबा केला जात आहे. हा प्रकार म्हणजे बाळ जन्मण्याआधीच त्याचा वाढदिवस करण्याचा, इतिहास संशोधकांना, दिग्गज मंडळींना नालायक ठरवण्याचा प्रयत्न आहे. शिवप्रेमींनी चुकीच्या गोष्टींमागे फरफटत न जाता, डोळसपणे याचा विचार करावा. -इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivrajyabhishekशिवराज्याभिषेक