शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी साडेतीन हजारांवर 'ईव्हीएम'; कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 12:50 IST

५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्धी

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणार असून, त्यावेळी मतदारांचा खरा आकडा कळणार आहे. तत्पूर्वीच निवडणुकीला लागणाऱ्या साहित्यांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मतदानासाठी साडेतीन हजारांवर ईव्हीएम मशिन तयार आहेत, तर नियुक्तीसाठी २६ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.लोकसभेची निवडणूक फेब्रुवारी-मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू असलेल्या तयारीला वेग आला आहे. मतदार यादीवर आलेल्या हरकती, अर्जांवर निर्णय घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी होती. ती आता संपली आहे. आता ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतरच्या मतदारांची नावे पुरवणी यादीत प्रसिद्ध होतील. सध्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या स्टेशनरी साहित्यांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

साडेतीन हजारांवर ईव्हीएम मशिनजिल्ह्यात सध्या ३ हजार ३५९ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी काही मशिनमध्ये बिघाड झाला, तर रिझर्व्ह म्हणून २० टक्के मशिन जास्तीचे ठेवले जातात. विभागनिहाय जास्तीचे मशिन पाठविले जातात. एका मतदान केंद्रावर १ हजार ५०० मतदारांची मर्यादा आहे, त्याहून जास्त मतदार झाले, तर केंद्र वाढवावे लागते. अंतिम मतदार यागी ५ जानेवारीला प्रसिद्ध झाल्यावरच मतदान केंद्रांची संख्या अंतिम ठरेल.

प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांची माहिती

निवडणुकीच्या दृष्टीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनिंग पूर्ण झाले आहे, तसेच अधिकारी, वर्ग २, वर्ग ३ मधील अशा एकूण २६ हजारांवर कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यावरच त्यांची नियुक्ती केली जाईल.

मतदारसंघनिहाय जनजागृतीईव्हीएम मशिनबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी मतदारसंघनिहाय २ वाहने देण्यात आली आहेत. या वाहनात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन असून, नागरिकांना मतदान केल्यानंतर पुढे मशिनमध्ये त्याची प्रक्रिया कशी होते, क्रॉस चेक कसे करता येते, याची माहिती कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे. युथ आयकॉन म्हणून वीरधवल खाडे हे नागरिकांना मतदान जागृतीचे आवाहन करणार आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागाची तयारी वेगाने सुरू आहे. मतदार यादी अचूक असावी, यासाठी काटेकोर तपासणी करण्यात आली आहे. दुबार नावे व छायाचित्र असलेल्या मतदारांबद्दलची कार्यवाहीही बीएलओमार्फत केली जात आहे. - समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकEVM Machineएव्हीएम मशीन