शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीच्या राजूकडून ३५० कोटींची फसवणूक, निमितसागर महाराजांचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 12:25 IST

रक्कम परत न मिळाल्यास कोणत्याही क्षणी पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा

हुपरी : विविध उद्योगांची उभारणी करून मोठा लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने येथील राजू नामक महाठकसेनने सुमारे ३५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तोंडी माहिती निमितसागर महाराज यांनी हुपरी पोलिसांना दिली. ही रक्कम परत मिळावी यासाठी महाराजांनी सोमवारी दुपारपासून त्या ठकसेनच्या हुपरी (ता. हातकणंगले) येथील शिवाजीनगरातील दारातच उपोषण सुरू केले.माझ्या सांगण्यावरून राज्यांतील विविध प्रांतातील श्रावकांनी ही रक्कम गुंतवणूक केली असल्याने ही रक्कम परत न मिळाल्यास कोणत्याही क्षणी पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा निमितसागर महाराजांनी हुपरी पोलिस व पत्रकारांशी बोलताना दिला. त्यामुळे पोलिस हादरले आहेत.या फसवणुकीची तक्रार मुंबई पोलिसांत दिली असल्याने आणखी तक्रार देणार नसल्याचे त्यांनी महाराज यांनी सांगितले. विविध प्रकारचे उद्योग उभारणी करणे, शेळी-मेंढी पालन तसेच विविध प्रकारच्या करन्सीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देतो, असे आमिष दाखवले. या महाठकसेन राजूने आपल्या मधाळ बोलण्याने देशातील अनेक प्रांतांतील शेकडो जणांना कोट्यवधी रुपयांना फसविले आहे. त्याच्या विरोधात अनेक राज्यांतील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हेही दाखल आहेत.काही महिन्यांपूर्वीच त्याचे संपूर्ण कुटुंब जेलची हवा खाऊन परतले आहे. कर्जावू रक्कम घेणाऱ्या काहींनी आत्महत्या केल्या आहेत. काहींनी पोलिसांच्या माध्यमातून जुजबी रक्कम पदरात पाडून घेऊन तडजोडही केली आहे. या महाठकसेन राजूच्या मधाळ व लाघवी बोलण्याला फसून निष्ठावंत श्रावकांना सांगून या राजूला थोडीथोडकी नाही तर तब्बल सुमारे ३५० कोटी रुपये दिल्याचे निमितसागर महाराज यांनी सांगितले. ही रक्कम परत मिळावी म्हणून श्रावकांनी महाराजांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे वैतागलेल्या निमितसागर महाराजांनी वेगळाच पवित्रा घेतला असून त्यामुळे शहरवासीयांबरोबरच पोलिसही चक्रावले आहेत.

पोलिस बंदोबस्तठकसेन राजू याच्या दारातच निमितसागर महाराजांनी ठाण मांडले आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी फौजदार व दोन हवालदार दिवसभर तैनात होते. हेच महाराज यापूर्वी फेब्रुवारी ते जुलै २०२३ अखेर त्याच्या याच घरी वास्तव्यात होते. महाराज आणि ठकसेन राजू यांची ओळख उत्तूरच्या देशमाने यांच्या माध्यमातून झाल्याची माहिती स्वत: निमितसागर यांनी दिली. याचप्रकरणी देशमाने व राजू ठकसेन याच्यावर सदलगा (ता. चिक्कोडी) पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

फसवणूक कितीची..?निमितसागर महाराज यांनी गुंतवणूक केलेल्या पावत्याही दाखवल्या. यातील निम्म्याहून अधिक देवाण-घेवाणही बँकेच्या माध्यमातून झाली असल्याने ते व्यवहार तपासल्यावर नेमकी कितीची फसवणूक झाली हे उघड होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी