शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

corona virus : कोल्हापुरात ३३,१११ रुग्ण, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा एक हजाराचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 13:55 IST

मृत्यूचा आकोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा जसा झपाट्याने वाढत चालला आहे तसा मृत्यूचा आकडा सुध्दा वाढत चालला आहे. शुक्रवारी एक हजाराचा टप्पा पार झाल्याने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा १०१० वर जाऊन पोहचला. कडा एक हजाराचा टप्पा पार

ठळक मुद्देकोल्हापुरात ३३,१११ रुग्णकोरोना रुग्णांच्या मृत्यूचा एक हजाराचा टप्पा पार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा जसा झपाट्याने वाढत चालला आहे तसा मृत्यूचा आकडा सुध्दा वाढत चालला आहे. शुक्रवारी एक हजाराचा टप्पा पार झाल्याने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा १०१० वर जाऊन पोहचला.

रुग्णांची संख्या आता ३३ हजार १११ इतकी झाली आहे. मृत्यूचा दर हा तीन टक्क्याच्यावर असून तो राज्यातील सर्वाधिक असून आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारा आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ९८१ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २५ व्यक्ती कोरोनाच्या बळी ठरल्या. गेल्या काही दिवसापासून सातत्याने आठशे ते हजार रुग्ण नव्याने नोंद होत असून २५ ते ३० रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. शुक्रवारचा दिवस देखिल त्याला अपवाद ठरला नाही. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील एक मोठा हॉटस्पॉट बनला आहे.शुक्रवारी मृत्यू झालेल्या २५ जणांमध्ये २० पुरुषांचा तर पाच महिलांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील भोसलेवाडी, शिवाजीपेठ, साळोखे पार्क, रिंगरोड, मंगळवारपेठ या परिसरातील पाच जणांचा तर करवीर तालुक्यातील वडणगे, पाचगांव, परिते येथील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील सरस्वती कॉलनी, अयोध्या कॉलनी, जवाहरनगर व इचलकरंजी शहर येथील रुग्ण कोरोनामुळे दगावले.

गडहिंग्लज शहरातील दोन तर कडगांव, बसर्गे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला. याशिवाय जयसिंगपूर, दत्तवाड (शिरोळ), गोटखिंडी (वाळवा), आजरा शहर, उंब्रज (कराड), कोरोची (हातकणंगले), जाखल (पन्हाळा) व कागल शहर येथील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.कोल्हापुरात २५९ नवीन रुग्णकोल्हापूर शहरात शुक्रवारी २५९ नवीन रुग्ण आढळून आले. याशिवाय करवीर तालुक्यात १२४, हातकणंगले ९७, चंदगड, गडहिंग्लज प्रत्येकी २२, आजरा १५, भुदरगड २४, कागल ४८, शिरोळ ३९, शाहूवाडी ३३, राधानगरी १२ नवीन रुग्ण आढळून आले. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामिण भागातही कोरोनाने जोरदार मुसंडी मारली असल्याचे हे आकडे सांगतात.मृत्यूचा हजाराचा टप्पा पारकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे एक हजाराहून अधिक जणांचे बळी जातील असे कोणी सांगितले असते तर त्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. परंतू आता आकडे बोलत असून रुग्णांच्या मृत्यूचा एक हजाराचा टप्पाही पार झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने ही अधिक चिंतेची बाब आहे. मृतांमध्ये पुरुषांचा आकडा जास्त असून बहुतेक मृत्यू हे कोरोनाबरोबरच अन्य व्याधीने झाले आहेत.चोवीस तासातील कोरोना चाचणी अहवाल

  • आरटीपीसीआर तपासणी - २६९६
  • त्यापैकी निगेटिव्ह अहवाल - २१५०
  • पॉझिटिव्ह अहवाल - ५२०
  • ॲन्टीजन तपासणी पूर्ण - ३९६
  •  त्यापैकी निगेटिव्ह अहवाल - २९३
  • तर पॉझिटिव्ह अहवाल- १०३
  •  खासगी रुग्णालयातील पॉझिटिव्ह - २६८

तालुका निहाय रुग्ण संख्याआजरा - ५७५, भुदरगड - ७१९, चंदगड - ७१२, गडहिंग्लज ७७१ , गगनबावडा - ९१, हातकणंगले - ३८४३, कागल - ११२३, करवीर - ३६१८, पन्हाळा - ११६६, राधानगरी - ८६७, शाहूवाडी - ७६६, शिरोळ - १८१५, नगरपालिका हद्द - ५४६८, कोल्हापूर शहर - १०,५३३, इतर जिल्हा - १०४४.

 

  • जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या - ३३ हजार १११
  •  बरे झालेले एकूण रुग्ण संख्या - २१हजार ४४१
  •  मयत झालेल्या रुग्णांची संख्या - १०१०
  •  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १० हजार ६६०
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर