शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

ड्रेनेज योजनेसाठी ३२ कोटी मंजूर

By admin | Updated: February 10, 2017 22:45 IST

‘नगरविकास’कडून आदेश : सांगलीसाठी २०.३५ कोटी, तर मिरजेसाठी ११.१८ कोटींचा निधी

सांगली : सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजनेसाठी ३१ कोटी ५४ लाख १४ हजार रुपयांचा दुसरा हप्ता महापालिकेच्या हाती लवकरच मिळणार आहे. नगरविकास खात्याचे सहसचिव पां. जो. जाधव यांनी निधी वितरणाचा आदेश शुक्रवारी काढला आहे. त्यामुळे आता सांगली व मिरजेच्या ड्रेनेज योजनेला गती मिळणार आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी निधी मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. २०१० मध्ये विकास महाआघाडीच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी सांगलीसाठी ८२.२२, तर मिरजेसाठी ५६.५३ कोटींची ड्रेनेज योजना मंजूर केली होती. या योजनेला २०१३ मध्ये मुहूर्त लागला. योजनेची निविदा जादा दराने मंजूर झाल्याने १३८ कोटीची योजना १८७ कोटींवर गेली आहे. गेल्या चार वर्षात या योजनेतील सांगली आणि मिरजेत कामे सुरू आहेत. या योजनेत काही प्रमाणात गैरकारभार झाल्याच्या तक्रारी झाल्या. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारीही झाल्या होत्या. त्याबाबत चौकशीचा फेराही झाला आहे.आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून ड्रेनेज योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. ठेकेदार, पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन खेबूडकर यांनी योजनेला गती दिली. यापूर्वी राज्य शासनाने सांगलीसाठी २० कोटी ५६ लाख, तर मिरजेसाठी २८ कोटी ६३ लाखाचा निधी दिला होता. या निधीतील कामे पूर्ण करून त्याचे युुटिलिटी प्रमाणपत्र नगरविकास खात्याकडे सादर केले होते. त्यानंतर सांगलीसाठी दुसरा हप्ता व मिरजेसाठी सुधारित आकृतीबंधानुसार निधी मिळविण्यासाठी खेबूडकर यांनी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने शुक्रवारी सांगलीसाठी दुसरा हप्ता २० कोटी ३५ लाख, तर मिरजेसाठी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवडाभरात हा निधी महापालिकेकडे वर्ग होईल. त्यातून ड्रेनेज योजनेतील प्रलंबित कामांना गती मिळणार आहे.दरम्यान, ड्रेनेज योजना लवकरात लवकर मार्गी लागावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून निधी आणल्याचे आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनी सांगितले. दोन्ही शहरातील उपनगरांमध्ये ही योजना येत्या एप्रिलअखेर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने ठेकेदार, मनपा प्रशासनाला कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)आणखी सोळा कोटी येणारमहापालिकेच्या ड्रेनेज योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सांगलीसाठी ५ कोटी ८३ लाखाचा मनपा हिस्सा योजनेत समाविष्ट केल्यानंतर शासनाकडून आणखी १६ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यासाठी ड्रेनेज विभागाकडून प्रयत्न होणार आहेत.