शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय, ३०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 14:26 IST

बचतगटाच्या माध्यमातून प्रगतीचे शिखर गाठणाऱ्या महिलांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामविकास विभागाने महाजीविका अभियान सुरु केले आहे.

कोल्हापूर : बचतगटाच्या माध्यमातून प्रगतीचे शिखर गाठणाऱ्या महिलांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामविकास विभागाने महाजीविका अभियान सुरु केले आहे. याच्या माध्यमातून ३०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय रचणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी मुंबईत केली.ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने महाजीविका अभियानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, गृहनिर्माण (ग्रामीण)चे संचालक डॉ. राजाराम दिघे, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.मुश्रीफ यांनी चालू वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे होणार असल्याचे सांगताना यामध्ये उपजीविका व विपणन या विषयावर भर देण्यासाठी हे अभियान हाती घेतल्याचे सांगितले. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन राज्यातील किमान दहा लाख महिलांना उपजीविका साधने उपलब्ध करून देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यातील त्रुटी दूर करुन बचत गटांच्या महिलांचे जीवन सुखी व संपन्न करूया, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

महिलांच्या प्रगतीचा आलेख

  • राज्यातील ५६ लाख कुटुंबांचा सहभाग
  • ५ लाख ४७ हजार स्वयंसहाय्यता गट स्थापन
  • १२ हजार ४७९ रुपयांच्या बँक कर्जाचे वाटप
  • कोविडकाळात मास्क विक्रीतून ११.२५ कोटींची उलाढाल.
  • सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचे बीजभांडवल वितरीत.
  • बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत ४ उपप्रकल्प मंजूर 

जिल्हा परिषदेची शाळा देण्याची सूचना

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गावातच व्यापार वाढीस लागावा म्हणून बचत गटाच्या महिलांना त्याच गावातील जिल्हा परिषदेची शाळा दीड दिवसांकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाHasan Mushrifहसन मुश्रीफ