शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कणेरीत ३00 रूपयाला पाण्याचे बॅरेल

By admin | Updated: March 20, 2017 23:37 IST

गटातटाच्या श्रेयवादात ग्रामस्थांचे हाल : टंचाईच्या झळा तीव्र; कामधंदा सोडून वणवण; उपाययोजना करण्याची मागणी

पांडुरंग फिरंगे -- कोतोली  -कणेरी (ता. पन्हाळा) येथील ग्रामस्थांना एक महिन्यापासून पाण्याच्या एका बॅरेलला ३०० रुपये मोजावे लागत आहेत. जनावरांचा पाणीप्रश्नही गंभीर बनला असून, कामधंदा सोडून पाणी मिळविण्यासाठी दिवस-रात्र भटकावे लागत आहे. गटातटाच्या श्रेयवादात ग्रामस्थांचे हाल होत आहेत.गावची तीन हजारांची लोकवस्ती असून, गावापासून नदी लांब असल्याने तेथून पाणी आणण्याचा खर्च ग्रामपंचायतीला झेपणारा नाही. म्हणून गावाला पिण्याच्या पाण्यासाठी गावाजवळच बोअर मारण्यात आले होते. त्या बोअरचे पाणी टाकीत साठवून गावाला सोडले जात होते. अनेक वर्ष पाणी सुरळीत येत होते. पण गतसालच्या दुष्काळामुळे बोअरचे पाणी कमी झाले. सध्या तर एक महिन्यापासून पाणीटंचाई जाणवत असून, पिण्याचे पाणी कोतोलीतून विकत घ्यावे लागत आहे. एक बॅरेल पाण्यासाठी ३०० रुपये मोजावे लागत असून, यामुळे सर्वसामान्य जनतेच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.ग्रामपंचायतीला बोअरचे लाईट बिल परवडत नसल्यामुळे मोटार बंद होती. ती सध्या चालू केली असून, या बोअरवर प्रत्येकी दोनच घागरी पाणी मिळत आहेत. येथे पाणी मिळवण्यासाठी महिलांची कमालीची गर्दी पहावयास मिळत आहे.ग्रामपंचायतीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पन्हाळा पंचायत समिती, जिल्हाधिकारी, आदींना याबाबत निवेदने दिली आहेत. पाणी टंचाईकडे कोणी लक्ष देणार का, अशीच समस्या कायम राहणार, असा जनतेतून प्रश्न केला जात आहे. तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने कणेरी व गावाला लागून असलेल्या दोन वाड्यांच्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करून जनतेची समस्या मिटवावी, अशी मागणी होत आहे.कणेरीपैकी भोसलेवाडी, गवळेवाडी ग्रामस्थांना पंधरा दिवसांतून सध्या पाणी मिळत आहे. दिवस-रात्री पाणी मिळविण्यासाठी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या सण, समारंभ, लगीनघाई असताना पाणीटंचाई होत आहे. यामुळे काम करायचे की पाणी मिळवायचे? जनावरांना पिण्याचे पाणी मिळविण्यास अडचणी आहेत. याचा दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. येथील जनतेचा लोकप्रतिनिधींनी केवळ मतदानापुरताच वापर करुन घेतला आहे. बाकी इतर समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. - अर्जुन गवळी, ग्रामस्थ..ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने विविध प्रयत्न चालू केले आहेत. लवकरच यावर कायमचा मार्ग काढू. - तानाजी लगारे, उपसरपंच कणेरी गावात असलेल्या दोन्ही गटांनी मीपणा सोडल्याशिवाय गावच्या समस्या सुटणार नाहीत. नेतेमंडळींनी यातून मार्ग काढावा. - विश्वास गायकवाड, ग्रामस्थगावची पाणीटंचाई सोडविण्यासाठी नेत्यांनी मार्ग यातून काढावा व पाण्यासारखा जिव्हाळ्याचा प्रश्न मिटवावा. - वैशाली पाटील, महिला.