शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेंडा पार्कमधील शवागृहात एकाचवेळी ३० मृतदेह ठेवता येणार, मात्र, नातेवाईकांचा फेरा वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:20 IST

प्रशस्त इमारत, अत्याधुनिक सुविधा; मृतदेह घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र शववाहिकेची व्यवस्था

कोल्हापूर : शेंडा पार्क येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन शवागृहाचा वापर सुरू झाला आहे. प्रशस्त इमारत आणि अत्याधुनिक सुविधांमुळे पोस्टमार्टम वेळेत होण्यासह एकाचवेळी तब्बल ३० मृतदेह शीतगृहात ठेवण्याची सोय या ठिकाणी झाली आहे. उपचार सीपीआरमध्ये आणि शवविच्छेदन शेंडा पार्कात होणार असल्याने नातेवाईकांचा फेरा वाढणार आहे.सीपीआरमधील शवागृहाची दुरवस्था झाली होती. इमारतीची पडझड आणि शीतगृह नादुरुस्त झाल्याने तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांसह मृतांच्या नातेवाइकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पोस्टमार्टमसाठी एकच बेड होता, त्यामुळे एकाचवेळी दोन-तीन मृतदेह आल्यास नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागत होते. यावर उपाय म्हणून शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात शवागृहाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. नुकतेच या इमारतीचा वापर सुरू झाला आहे. एकाचवेळी पाच मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. तसेच, शीतगृहात ३० मृतदेह ठेवता येतात. यामुळे बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेईपर्यंत पोलिसांना संबंधित मृतदेह शीतगृहात ठेवता येत आहेत. यापूर्वी सीपीआरमधील शीतगृहात केवळ दोन मृतदेह ठेवण्याची सोय होती. त्यामुळे पोलिस आणि नातेवाइकांना खासगी रुग्णालयांच्या शीतगृहात मृतदेह ठेवावे लागत होते.विद्यार्थ्यांची सोयवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोस्टमार्टम पाहण्याची व्यवस्था नवीन इमारतीत केली आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि बेडची संख्या वाढल्यामुळे कामकाज सुधारणार आहे.स्वतंत्र शववाहिकासीपीआरमधून शेंडा पार्क येथे मृतदेह घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र शववाहिकेची व्यवस्था केली आहे. ही शववाहिका सीपीआरच्या अपघात विभागासमोर असते. नातेवाइकांना खासगी शववाहिका बोलवण्याची गरज पडत नाही. मात्र, यापूर्वी सीपीआरमध्ये एकाच ठिकाणी होणाऱ्या कामासाठी आता शेंडा पार्कमध्ये फेरा मारावा लागत आहे. सीपीआर पोलिस चौकीतील पोलिसांना आता मृताची माहिती राजारामपुरी पोलिसांना कळवावी लागते. त्यानंतर पुढील कार्यवाही राजारामपुरी पोलिसांकडून केली जाते.