शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

कोल्हापूर  जिल्ह्यातील निवारागृहांमध्ये परराज्यातील ६२३ जण ; राज्यातील १८१ जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 11:20 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील १६ निवारागृहांमध्ये राज्यातील १८१ आणि परराज्यातील ६२३ अशा एकूण ८०४ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे, ...

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यातील १६ निवारागृहांमध्ये राज्यातील १८१ आणि परराज्यातील ६२३ अशा एकूण ८०४ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिली.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालयात राज्यातील २३ परराज्यांतील ६ असे २९ जण, रामकृष्ण हॉल (लोणार वसाहत) मध्ये राज्यातील २०, परराज्यांतील ९ असे २९ जण, मुलींची शाळा क्रमांक सहा (लाईन बाजार) येथे राज्यातील ९ परराज्यांतील ११ असे एकूण २० जण आहेत. करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयामध्ये राज्यातील २, परराज्यांतील ३५ एकूण ३७ जण, तर डी. फार्मसी कॉलेजमध्ये राज्यातील ९, परराज्यांतील ३५ असे एकूण ४४ जण आहेत.

कागल तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राज्यातील २, परराज्यांतील ९७ एकूण ९९ जण आहेत. जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील २६, परराज्यांतील १०३ असे एकूण १२९ जण आणि हातकणंगले तालुक्यामध्ये निवासी गुरुकुल वडगाव येथे राज्यातील २, परराज्यांतील ८५ असे एकूण ८७ जण, अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील ३ परराज्यांतील १०३ असे एकूण १०६ जण, इचलकरंजीतील शहरी बेघर निवारा केंद्रात राज्यातील ४५ परराज्यांतील ८ एकूण ५३ जण आहेत.

शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील शाळा क्रमांक एकमध्ये राज्यातील १३, परराज्यांतील १७ असे एकूण ३०, तर जैन सांस्कृतिक भवन कुरुंदवाड येथे परराज्यांतील चार आणि उर्दू हायस्कूल जयसिंगपूर येथे परराज्यांतील १२ जण आहेत. गडहिंग्लजमधील देवदासी छात्र वसतिगृहात राज्यातील ९, परराज्यांतील एक असे एकूण १० जण, तर गगनबावडा तालुक्यातील माधव विद्यालयात राज्यातील १३ जण, समाज कल्याण निवासी शाळा वसतिगृहात राज्यातील पाच आणि परराज्यांतील ९७ असे एकूण १०२ जण आहेत.अन्य राज्यातील व्यक्तीकर्नाटक : २२८तमिळनाडू : २०९राजस्थान : ८६मध्यप्रदेश : ४७उत्तर प्रदेश : २९केरळ : ८पाँडेचरी, पश्चिम बंगाल : प्रत्येकी एकआंध्रप्रदेश : ३झारखंड : ५बिहार : २हरियाणा : ४ 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी