शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

जरळीत ३ तासांचा थरार, ५० फूट विहिरीत पडलेल्या घोणसला जीवदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 15:30 IST

snake ForestDepartment Kolhapur : सुमारे ५० फुट खोल विहिरीत पडलेल्या साडेपाच फूट लांबीच्या अत्यंत विषारी जातीच्या घोणस सापाला एका जिगरबाज सर्पमित्राने जीवदान दिले.त्याचे नाव आहे,आप्पासाहेब ऊर्फ आप्पा मारूती दुंडगे. जरळी (ता.गडहिंग्लज ) येथील तब्बल तीन तासांच्या थरारक घटनेची गडहिंग्लजसह सीमाभागात जोरदार चर्चा आहे.

ठळक मुद्देजरळीत ३ तासांचा थरार, ५० फूट विहिरीत पडलेल्या घोणसला जीवदान !धाडसी सर्पमित्र 'आप्पा'चे गडहिंग्लजसह सीमाभागात कौतुक

राम मगदूम

गडहिंग्लज : सुमारे ५० फुट खोल विहिरीत पडलेल्या साडेपाच फूट लांबीच्या अत्यंत विषारी जातीच्या घोणस सापाला एका जिगरबाज सर्पमित्राने जीवदान दिले.त्याचे नाव आहे,आप्पासाहेब ऊर्फ आप्पा मारूती दुंडगे. जरळी (ता.गडहिंग्लज ) येथील तब्बल तीन तासांच्या थरारक घटनेची गडहिंग्लजसह सीमाभागात जोरदार चर्चा आहे.हकीकत अशी,१५ दिवसांपूर्वी जरळी येथील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र दुंडगे यांच्या घरानजीकच्या शेतातील विहिरीत घोणस जातीचा साप अचानकपणे पडला होता. नूल - भडगाव मार्गावरील जरळी बस थांब्यानजीकच्या या विहिरीचे पाणी त्या परिसरातील नागरिक पिण्यासाठी वापरतात.त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना धोका नको म्हणून गावातील सर्पमित्र आप्पा आणि काही तरुणांनी त्या सापाला पाण्यातून बाहेर काढण्याचा निर्धार केला.त्यासाठी भरपूर प्रयत्नही केले.परंतु, झाडा- झुडपांनी वेढलेल्या त्या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय नसल्याने अडचणी येत होत्या.त्यामुळे विहिरीच्या तीन्ही बाजूंनी दोर बांधण्यात आले.त्या दोरीच्या सहाय्याने सर्पमित्र आप्पा विहिरीत उतरला.दगडांच्या फटीत बसलेल्या 'त्या' सापाला त्यांने जिवंत पकडले.'त्या' सापासह आप्पालाही दोरीच्या सहाय्याने विहिरीतून वर काढण्यात आले.त्यानंतर त्या सापाला आजरानजीकच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.दोनवेळा साप अंगावर...!पहिल्यांदा आप्पाने त्या सापाला बादलीत घालून वर काढण्याचा प्रयत्न केला.परंतु,बादली निम्यावर जाताच साप बादलीतून पुन्हा विहिरीतील पाण्यात पडला.त्यानंतर त्याने काठीच्या साह्याने सापाला विहिरीतून वर नेण्याचा प्रयत्न केला‌.त्यावेळी काठीतून निसटून तो साप पुन्हा खाली पडला.

दोनवेळा साप अंगावर पडता- पडता बचावल्यानंतर त्याने साप पकडण्याच्या काठीनेच त्याला पकडले.त्यावेळी सापाने त्या काठीलाच वेटोळे घातले.एका हातात सापाची काठी आणि दुसऱ्या हाताने दोर पकडलेल्या आप्पाला विहिरीच्या काठावर थांबलेल्या तरूणांनी सापासह सुखरूप वर काढले. त्यामुळे काळीज चिरणाऱ्या त्याच्या फुत्काराची आणि त्याला पकडण्याच्या थराराचीच चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.

टॅग्स :snakeसापkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग