इचलकरंजी/कोल्हापूर : अभाविप इचलकरंजी शाखेने स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) व नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती (२३ जानेवारी) निमित्त व हिंदुस्थानच्या सत्तराव्या गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप १२३४ फूट तिरंगा पदयात्रा शहरातून काढून झाला.इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच १२३४ फूट लांबीचा भव्य ध्वज घेऊन इचलकरंजी मधील ११५० तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला. या यात्रेची सुरुवात स्वामी विवेकानंद व श्री सरस्वती प्रतिमा पूजनाने व छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार एडिशनल एसपी श्रीनिवास घाडगे, अभाविप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रतीक पाटील, इचलकरंजी शहर मंत्री शांतनू बिरोजे, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य पंकज मेहता, अनुलोमचे नरोत्तम लाटा, पंकज गडकरी यांच्या शुभहस्ते घालण्यात आले.इचलकरंजी मधील मुख्य रस्त्यांवरून देशभक्तीपर घोषणा देत ही राष्ट्रभक्त तरुणाई उत्साहात तिरंगा डौलाने पकडून शाहू पुतळा, शिवतीर्थ, जनता चौक येथून चालून नाट्यगृह चौकात जाहीर सभेने समारोप झाला.यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक पाटील यांनी युवकांना संबोधित केले. यामध्ये तिरंगा पदयात्रा म्हणजे इचलकरंजी मधील युवकांचा धगधगत्या राष्ट्रभक्तीचे दर्शन झाल्याचे समाधानकारक उद्गार प्रतीक पाटील यांनी काढले.
अभाविपतर्फे इचलकरंजीमध्ये १२३४ फूट भव्य तिरंगा यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 11:44 IST
अभाविप इचलकरंजी शाखेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) व नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती (२३ जानेवारी) निमित्त व हिंदुस्थानच्या सत्तराव्या गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप आज १२३४ फूट तिरंगा पदयात्रा शहरातून काढून झाला.
अभाविपतर्फे इचलकरंजीमध्ये १२३४ फूट भव्य तिरंगा यात्रा
ठळक मुद्देअभाविपतर्फे १२३४ फूट भव्य तिरंगा यात्रा इचलकरंजीमध्ये युवक सप्ताहाचा समारोप