शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील १०० डॉक्टरांची कोल्हापूर, सांगलीत रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:05 IST

कोल्हापूर : एखाद्या नेत्याने मनात आणले तर काय करता येते, याचे उत्तम उदाहरण आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घालून दिले ...

ठळक मुद्देठाण्यातील १०० डॉक्टरांची कोल्हापूर, सांगलीत रुग्णसेवाएकनाथ शिंदे यांची चोख यंत्रणा, पूरग्रस्त भागांत दहा दिवस ठोकला तळ

कोल्हापूर : एखाद्या नेत्याने मनात आणले तर काय करता येते, याचे उत्तम उदाहरण आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घालून दिले आहे. स्वत: १० दिवस कोल्हापूर आणि सांगलीत तळ ठोक णाऱ्या शिंदे यांनी दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील १०० डॉक्टरांचे पथक या दोन्ही जिल्ह्यांत १० दिवसांसाठी कार्यरत ठेवले आणि पूरग्रस्त गावांमध्ये कार्यरत असणाऱ्या शासनाच्या आरोग्यसेवेला मोठे बळ दिले.महापूर आल्यानंतर शिंदे यांनी या दोन्ही जिल्ह्यांत मुक्काम ठोकला. शासनाच्या आरोग्य खात्याची यंत्रणा एकीकडे कामाला लावतानाच त्यांच्या लक्षात आले की, हे काम केवळ शासकीय यंत्रणेला झेपणार नाही.

पूर ओसरल्यानंतर या विभागाचे काम एकदम वाढणार आहे. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांना आवाहन केले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वय मंगेश चिवटे आणि डॉ. जे. बी. भोर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १०० डॉक्टरांचे पथक १२ आॅगस्टला कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले.गेल्या १० दिवसांमध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, शाहूवाडी, कोल्हापूर शहर, पलूस, वाळवा, इचलकरंजी परिसरांतील ७२ गावांमध्ये त्यांनी वैद्यकीय शिबिरे घेतली. ४२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. सव्वादोन कोटी रुपयांच्या औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. ५००० डेंग्यू किटस्चे वितरण करण्यात आले. या तपासणीदरम्यान अ‍ॅनिमिया, मलेरिया आणि त्वचारोग झालेले अनेक रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. या सर्व डॉक्टरांच्या मदतीसाठी शिवसेनेचे १२० पदाधिकारीही त्यांच्यासमवेत होते.त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने या पथकाचा सत्कारही करण्यात आला. अतिशय गरजेच्या वेळी आम्हांला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत येऊन काम करता आले, याचे समाधान असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.खासदारांकडूनही रुग्णतपासणीकल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवीत असताना स्वत: खासदार श्ािंदे या शिबिरांमध्ये रुग्णतपासणी करीत होते. खासदार राजन विचारे यांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरdocterडॉक्टरEknath Shindeएकनाथ शिंदेkolhapurकोल्हापूर