शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सीए परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची बाजी, गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच 'इतके' विद्यार्थी झाले उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 11:30 IST

कोल्हापूरमधील चारशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती

कोल्हापूर : चार्टर्ड अकौटंट (सीए) अभ्यासक्रमाची डिसेंबरमध्ये अंतिम परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला. त्यात कोल्हापुरातील २९ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत बाजी मारली आहे. गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच कोल्हापूरमधील इतके विद्यार्थी सीए परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.कोल्हापूरमधील चारशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांपैकी २८ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यात सम्मेद सुभाष गाट, साहिल विष्णुकुमार चंदवाणी, मिहीर चारूदत्त महाजनी, पार्थ जितेंद्र पटेल, रोहन राजेंद्रकुमार पाटील, श्रेयश मुकुंद एतावडेकर, जयदीप सत्त्वशील जाधव, रिचा अशोक वेर्णेकर, साहिल वरियल दुल्हानी, मृगांक मिलिंद गोगटे, मोनिका खेतालाल भावाणी, श्रुती रावसाहेब पाटील, तन्वी सुकुमार होनाळे, प्रिया मनोहर मते, ऋतुजा महेश रायबागकर, शारंग संजय मांगलेकर, विक्रम सचिन घाटगे, मीरा सुवर्णसिंग हजारे, पीयूष प्रेमचंद रोहिडा, तन्मय लालासो पाटील, एकता राजकुमार दुल्हानी, धनश्री दिनकर नलवडे, पृथ्वी विशाल शेठ, आरती अशोक दिवटे, प्रतीक दीपक दिवटे, अभिषेक विचारे, किरण चौधरी, निखिल शर्मा यांचा समावेश आहे. त्यांना आयसीएआयच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष तुषार अंतुरकर, उपाध्यक्ष सुशांत गुंडाळे, सचिव चेतन ओसवाल, खजानीस अमित शिंदे, माजी अध्यक्ष अनिल चिकोडी यांचे मार्गदर्शन लाभले.

गेल्या परीक्षेत २३ जणांचे यश- वर्षातून दोन वेळा ‘आयसीएआय’कडून परीक्षा घेण्यात येते. 

- जुलैमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर झाला होता. त्यात कोल्हापूरच्या २३ जणांनी यश मिळविले होते.

गेल्या दोन वर्षांपासून सीए परीक्षेतील यशाचा कोल्हापूरचा टक्का वाढत आहे. या वर्षी पहिल्यांदाच २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. - तुषार अंतुरकर, अध्यक्ष, आयसीएआय कोल्हापूर. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा