शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही मानवसेवा; कोल्हापुरातील अरुण माने कुटुंबीयांकडून बालकल्याणला २९ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 11:55 IST

संस्थेतील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी हातभार

कोल्हापूर : येथील गुजरीतील प्रसिद्ध कर सल्लागार अरुण विठ्ठल माने यांनी मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार तब्बल २९ लाख रुपयांचा धनादेश शुक्रवारी येथील बालकल्याण संकुलास प्रदान करण्यात आला. माने कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे साडू पांडुरंग पाटील व त्यांच्या पत्नी रागिनी पाटील यांनी हा धनादेश संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात अनौपचारिक कार्यक्रमात सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.बी.पाटील, मानद कार्यवाह पदमा तिवले उपस्थित होते. एखादी व्यक्ती गेल्यावर त्यांच्या मालमत्तेवरून अनेक कुटुंबांत टोकाचे संघर्ष सुरू असलेल्या काळात माने यांनी मृत्यूनंतरही कृतीतून अनोखी मानवसेवा केली.माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील म्हसवडचे. कोल्हापुरात तब्बल ४० वर्षे कर सल्लागार म्हणून काम केले. समाजऋण मानून काम करणाऱ्या माने यांना अपत्य नव्हते. पत्नी रेखा माने यांचे २०१९ मध्ये निधन झाले. आपली मालमत्ता समाजातील चांगले काम करणाऱ्या संस्थांना द्यावी, असे मृत्युपत्र त्यांनी केले होते. पांडुरंग पाटील व कार्यालयीन सहकारी कृष्णात वीर यांच्याकडे त्यांनी त्यासंबंधीचे अधिकार दिले. संस्थेच्या तिवले यांच्याशी पांडुरंग पाटील यांचे जुने ऋणानुबंध असल्याने त्यांनी बालकल्याण संकुलास प्राधान्य दिले. माने यांचे २६ फेब्रुवारी २०२२ ला निधन झाले. संपत्तीचा वाटप व्यवहार तपासण्यासाठी ॲड. अजित कुलकर्णी यांची माने यांनीच नियुक्ती केली होती. त्यानुसार ॲड. कुलकर्णी व वीर यांनी बालकल्याण संकुलास भेट दिली. या संस्थेत अनाथ निराधार, मुले-मुली यांचे आयुष्य उत्तम घडवले जात असल्याचे आणि आपण दिलेला पैसा तिथे योग्य कामासाठीच अत्यंत पारदर्शीपणाने वापरला जात असल्याचे पाहून त्यांना समाधान वाटले. संस्थेला निधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बालकल्याण संकुलातील एका कक्षास दिवंगत माने यांच्या पत्नी दिवंगत रेखा माने यांचे नाव देण्यात येणार आहे. निधी प्रदान कार्यक्रमास ॲड. कुलकर्णी, कृष्णात वीर हे देखील उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर