शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1058 क्युसेक विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 20:04 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1058 तर कोयनेतून 2111 क्युसेक विसर्ग सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज. तुळशी नदीवरील- बीड. वेदगंगा नदीवरील-वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली. वारणा नदीवरील माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड व दत्तवाड असे एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 33.27 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 36.35 इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा

तुळशी 44.40 दलघमी, वारणा 355.92 दलघमी, दूधगंगा 244.45 दलघमी, कासारी 29.27 दलघमी, कडवी 29.03 दलघमी, कुंभी 31.44 दलघमी, पाटगाव 33.34 दलघमी, चिकोत्रा 15.87 दलघमी, चित्री 12.92 दलघमी, जंगमहट्टी 7.27 दलघमी, घटप्रभा  34.04 दलघमी, जांबरे 5.64 दलघमी, कोदे (ल पा) 2.89 दलघमी असा आहे. बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे

 राजाराम 25.1 फूट, सुर्वे 24.6 फूट, रुई 54 फूट, इचलकरंजी 51 फूट, तेरवाड 46.6 फूट, शिरोळ 35.9 फूट, नृसिंहवाडी 30 फूट, राजापूर 19.6 फूट तर नजीकच्या सांगली 6.6 फूट व अंकली 10.2 फूट अशी आहे.गगनबावड्यात काल 86.50 मिमी पाऊसकोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 86.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.हातकणंगले- 11.63 एकूण 91.88 मिमी, शिरोळ- 12 एकूण 64 मिमी, पन्हाळा- 40.14 एकूण 303.29 मिमी, शाहुवाडी- 60.70 मिमी एकूण 382.50 मिमी, राधानगरी- 41.17 मिमी एकूण 399 मिमी, गगनबावडा-86.50 मिमी एकूण 907 मिमी, करवीर- 25.36 एकूण 280.18 मिमी, कागल- 41 एकूण 307.29 मिमी, गडहिंग्लज- 30 एकूण 185.43 मिमी, भुदरगड- 52.80 एकूण 332.20 मिमी, आजरा- 54.75 मिमी एकूण 371 मिमी, चंदगड- 59 मिमी एकूण 410.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर