शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
4
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
5
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
6
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
7
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
8
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
9
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
10
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
11
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
12
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
13
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
14
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
15
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
16
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
17
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
18
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
19
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
20
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरीतील २५० कोटींचे कापड उत्पादन ठप्प, यंत्रमाग कामगारांचे १ जानेवारीपासूनच काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 11:27 IST

यंत्रमाग कामगारांच्या १ जानेवारीपासूनच्या काम बंद आंदोलनाने वस्त्रनगरीतील २५० कोटी रुपयांचे कापड उत्पादन ठप्प झाले. तर यंत्रमाग कामगारांच्या पाच कोटी रुपयांच्या वेतनाची खोटी झाली आहे. यंत्रमागधारक आणि कामगार या दोघांचेही यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झालेले असल्यामुळे बुधवारी (दि.१०) प्रांताधिकारी कार्यालयात होणाºया प्रशासन व यंत्रमागधारकांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देयंत्रमाग कामगारांचे १ जानेवारीपासूनच काम बंद आंदोलनयंत्रमाग कामगारांच्या पाच कोटी रुपयांच्या वेतनाची खोटी

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या १ जानेवारीपासूनच्या काम बंद आंदोलनाने वस्त्रनगरीतील २५० कोटी रुपयांचे कापड उत्पादन ठप्प झाले. तर यंत्रमाग कामगारांच्या पाच कोटी रुपयांच्या वेतनाची खोटी झाली आहे.

यंत्रमागधारक आणि कामगार या दोघांचेही यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झालेले असल्यामुळे बुधवारी (दि.१०) प्रांताधिकारी कार्यालयात होणाºया प्रशासन व यंत्रमागधारकांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शहर व परिसरामध्ये १ लाख १० हजार यंत्रमाग आहेत. इचलकरंजीबरोबरच आसपासच्या खेडेगावांमध्ये यंत्रमाग कारखाने विखुरले आहेत. या कारखान्यांतून दररोज सुमारे ८० लाख मीटर कापड उत्पादन होते. त्यातून कामगारांना एक कोटी रुपये मजुरी मिळते. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये सहायक कामगार आयुक्तांकडून कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ जाहीर केली जाते. त्यासाठी एक वर्षाच्या महागाई निर्देशांकातील फरकाचा आधार घेतला जातो. मागील वर्षी नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे यंत्रमाग उद्योगाची घडी विस्कळीत झाली. त्यामुळे गतवर्षी कामगारांची मजुरीवाढ घोषित झाली नाही.

साधारणत: गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध यंत्रमाग कामगारांच्या संघटनांनी मजुरीवाढ जाहीर करण्यासाठी मेळावे, सभा व मोर्चे काढले. त्याचा परिणाम म्हणून सन २०१८ साठी होणारी ५२ पिकाच्या कापडास प्रतिमीटर तीन पैसे मजुरीवाढ सहायक कामगार आयुक्तांनी घोषित केली. मात्र, मागील वर्षीची मजुरीवाढ आणि मागील वर्षाचा वेतनातील फरक मिळावा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली. त्यासाठी मोर्चे काढले. सर्व कामगार संघटना एकत्रित येऊन १ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.अशा पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.६) प्रांताधिकारी कार्यालयात कामगार संघटनांची बैठक सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी आयोजित केली होती. बैठकीसाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे, सहायक कामगार आयुक्त गुरव, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, सतीश पवार, तसेच विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये सन २०१३ मधील कामगारांचा संप, त्यातून मिळालेली मजुरीवाढ, दरवर्षी जानेवारी महिन्यात मजुरीवाढ करण्यासाठी ठरलेले सूत्र, आदींचा ऊहापोह करण्यात आला. अखेर सन २०१७ मध्ये मजुरीवाढ मिळाली नसल्यामुळे प्रत्येक कामगारांचे वर्षाला नऊ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, असा मुद्दा कामगार संघटनांनी उपस्थित केला.

यावर प्रशासनाच्यावतीने यंत्रमागधारक संघटनांशी चर्चा करण्यात येईल व त्यानंतरच मजुरीवाढीबाबतचा योग्य तो तोडगा निघेल, असे सांगण्यात आले. म्हणून यंत्रमागधारक संघटनांची बैठक प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.१०) बोलविण्यात येईल, असे सहायक कामगार आयुक्तांनी जाहीर केले. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने पगारवाढीचा निर्णयसुद्धा घोषित होईल, असेही यावेळी ठरविले.वर्षाला बारा हजार रुपये फरक शक्यमहागाई निर्देशांकाप्रमाणे असणारा फरक लक्षात घेऊन त्यावर आधारित वेतनवाढ यंत्रमाग कामगारांना दरवर्षीसाठी जाहीर करावयाची आहे, असे सूत्र सन २०१३ च्या संपावेळी तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी निश्चित केले होते.

त्याप्रमाणे सन २०१७ साठी सहा पैसे व सन २०१८ साठी तीन पैसे अशी एकूण प्रतिमीटर नऊ पैसे वाढ कामगारांना मिळणार आहे. ज्यामुळे प्रत्येक कामगाराला दिवाळी व बोनससह ११ हजार ५०० ते १२ हजार रुपये अधिक मिळतील, असा दावा कामगार संघटनांचा आहे.