शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वित्त आयोगाचे २५० कोटी ग्रामपंचायतींच्या खात्यांवर शिल्लक, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 'इतके' कोटी खर्च

By समीर देशपांडे | Updated: February 22, 2024 18:02 IST

कामे लवकरात लवकर करावी लागणार

समीर देशपांडेकोल्हापूर : पंधरावा वित्त आयोग सुरू झाल्यापासून मिळालेल्या निधीपैकी अजूनही २५० कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी खर्च केलेले नाहीत. हा निधी या ग्रामपंचायतींना लवकरात लवकर खर्च करावा लागणार आहे. यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. एकीकडे ग्रामपंचायतींना हा निधी मिळाला असला, तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडील हा निधी प्रशासक असल्यामुळे पडून असून, नवा निधीही अदा करण्यात आलेला नाही. एकीकडे केंद्र शासनाने १६ व्या वित्त आयोगाची स्थापना केली असून, त्याची पुढची प्रक्रियाही सुरू झाली आहे. असे असताना आधीचा निधी खर्च वेळेत खर्च न केल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्यात १०२५ ग्रामपंचायतीजिल्ह्यातील १२ तालुक्यांत एकूण १०२५ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. यामध्ये चंदगड, राधानगरी, शाहूवाडी, करवीर, पन्हाळा, भुदरगड तालुक्यांत ग्रामपंचायतींची संख्या अधिक आहे.

आतापर्यंत ३२५ कोटी खर्च

पंधराव्या वित्त आयोगाच्या स्थापनेपासून म्हणजेच सन २०२१/२२ पासून कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून ५७५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील आतापर्यंत ३२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अजूनही २५० कोटी रुपये खात्यांवर शिल्लक आहेत.

२७१ ग्रामपंचायतींच्या खात्यावर २५० कोटीजिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायतींनी मिळालेला निधी खर्च केला आहे; परंतु २७१ ग्रामपंचायतींच्या खात्यावर अजूनही २५० कोटी रुपये शिल्लक असून, त्यांनी हा खर्च केलेला नाही.

३१ मार्चची मुदत नाहीवित्त आयोगाच्या या निधीला ३१ मार्चची मुदत नसते. त्यामुळे मार्च २०२४ अखेर हा निधी खर्च नाही पडला तरी तो लवकरात लवकर खर्च व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाबरोबरच मोठा निधी हा वित्त आयोगातून उपलब्ध होतो. हा निधी केवळ खर्च करण्याचा उद्देश नाही तर तो बंधित, अबंधित पद्धतीने गुणवत्तापूर्ण कामावर खर्च होण्याचा आग्रह आम्ही धरत आहोत. यासाठी दर महिन्याला गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांची बैठक घेतली जाते. गेल्या महिनाभरात २५ कोटींची कामे सुरू झाली.  - संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत