चंदगड तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण ८८२ नागरिक बाधित झाले आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.५ टक्के आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्या तुलनेत चंदगड तालुक्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी आहे.
पुुुणे-मुुंबई येथील चाकरमानी यावर्षी गावी न आल्याचेही एक कारण असू शकेल. चंदगड तालुक्यात एकूण ३२४ रुग्ण उपचार घेत आहेत. चंदगड तालुक्याचा मृत्यूदर जिल्ह्यात सर्वांत कमी आहे. चंदगड तालुक्यात सुसज्ज असे एकही हॉस्पिटल नाही. चंदगडमधील नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने तालुका त्रस्त असून रुग्णांना बेड मिळविणे कठीण झाले आहे.
राजकीय वशिलेबाजी आणि धनदांडगे आपल्या ताकदीवर बेड मिळवत असून गोरगरिबांना मात्र हातपाय घासून मरायची वेळ आली आहे. चंदगड तालुक्याला आरोग्याच्या बाबतीत गडहिंग्लज वा बेळगाववरच अवलंबून राहावे लागत आहे.
तपासणीसाठी टाळाटाळीमुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, जुलाब, उलट्या यासह अन्य लक्षणे दिसताच नागरिकांनी कोरोनाची तपासणी करणे आवश्यक आहे. चंदगड तालुक्यात १ एप्रिलपासून एकूण ८८२ रुग्ण सापडले असून त्यापैकी ५३५ रुग्ण बरे झाले आहेत तर ३२४ रुग्णांवर चंदगड गडहिंग्लज, कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. २६६ रुग्णांना घरी अलगीकरणात उपचार सुरू आहेत.