शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील २२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:18 IST

महापौर शिवसेनेचाच करू : क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, ताराराणी आघाडी या चारही पक्षांतील २२ माजी नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेसच्या शारंगधर देशमुख यांच्यासह तीन माजी महापौर, स्थायी समितीचे दोन माजी सभापती यांचा समावेश आहे.सत्ता आणणारे किंगमेकर शिंदेंसेनेत आल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल, असा विश्वास व्यक्त करतानाच कोल्हापूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे येथून पुढे कोल्हापूरचा विकास हाच अजेंडा घेऊन काम करू. मी एक कार्यकर्ता असल्याने सर्वसामान्य जनतेला सेवासुविधा देण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार जयश्री जाधव, सत्यजित कदम यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

जाग्यावर पलटी..माजी नगरसेवकांनी आज करेक्ट कार्यक्रम केला आहे. पहिल्या दणक्यातच खटक्यावर बोट ठेवून जाग्यावर पलटी केलंत. यापुढे अजून अनेक कार्यक्रम करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आपणाला महापालिका जिंकायची आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा शिवसेनामय- आबिटकरकोल्हापुरात आता पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर असे सगळेच चित्र शिवसेनेचे होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच निवडणुका ताकदीने लढवूया. मला विश्वास आहे उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या सगळ्या प्रश्नांना ताकद देतील, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

महापौर शिवसेनेचाच करू : क्षीरसागरकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आम्ही सगळे ताकदीने लढवू. महापालिकेवर भगवा फडकवू, तसेच महापौरही शिवसेनेचा करू, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली.