शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ज्यूट पोत्यांमुळे साखर उद्योगाला २०० कोटींचा भुर्दंड

By विश्वास पाटील | Updated: August 18, 2023 13:36 IST

किमान २० टक्के बारदान ज्यूटचे वापरण्याची सक्ती पुन्हा नव्याने होऊ लागली

विश्वास पाटीलकोल्हापूर : पश्चिम बंगालमधील ज्यूट कंपन्यांना ग्राहक मिळावेत, यासाठी साखर उद्योगाने किमान २० टक्के बारदान ज्यूटचे वापरण्याची सक्ती पुन्हा नव्याने होऊ लागली आहे. पॉली प्रॉपलिनचे (पीपी) पोते २५ रुपयांना येत असताना या पोत्यासाठी तब्बल ६५ रुपये मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्राचा विचार करता एका हंगामात त्यामुळे सुमारे २०० कोटी रुपयांचा नाहक भुर्दंड कारखान्यांवर पडणार आहे.केंद्र शासनाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ११ ऑगस्टला त्यासंबंधीचे नोटिफिकेशन काढले आहे. या विभागाचे संचालक संगीत यांनी येत्या हंगामात (२०२३-२४) देशभरातील साखर कारखान्यांनी ज्यूटचे बारदान किमान २० टक्के वापरले पाहिजे, असे बजावले आहे. त्याविरोधात कारखानदारीतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.पूर्वोत्तर राज्यातील ज्यूटच्या शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी केंद्र सरकार उर्वरित राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगुटीवर का पाय देत आहे, अशी विचारणा होत आहे. त्यातही ज्यूटचे बारदान तयार करणाऱ्या कंपन्या पश्चिम बंगालमध्ये असल्या तरी त्याचे पीक मुख्यत: बांगलादेशात होते. त्यामुळे हे बारदान वापरण्याची सक्ती करून शेतकऱ्यांचा नव्हे तर कंपन्यांचाच फायदा होणार आहे. खासगी उद्योगांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार हा अट्टहास का करत आहे, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. सरासरी पाच हजार प्रतिदिन गाळप क्षमता असलेला कारखाना हंगामात सहा लाख टन गाळप करतो. त्यातून साडेसात लाख क्विंटल साखर उत्पादन होते. त्यांना ५० किलोची १५ लाख पोती लागतात. पोत्यामागे ८० रुपयांचा वाढीव भुर्दंड धरल्यास हंगामात अडीच कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. याचा थेट फटका उसाच्या दरावर होणार आहे.

सुरक्षित पॉलिथीनचदुसरे महत्त्वाचे की, जेव्हा कारखान्यांकडून विविध खासगी कंपन्यांना साखर विक्री होते, तेव्हा त्यांची मागणी आतून प्लास्टिकचे आवरण असलेल्या पॉलिथीनच्या पोत्यातूनच त्याचा पुरवठा करावा, अशी असते. आताही कारखाने पॉलिथीनच्या पोत्यातूनच साखर पुरवठा करतात. त्यामध्ये साखर अधिक सुरक्षित राहते. त्यामुळे केंद्र शासनाला ज्यूट शेतकऱ्यांच्या हिताचा विचार असेल तर त्यांनी जादा रकमेपोटी साखर कारखानदारीस अनुदान द्यावे, अशीही मागणी साखर कारखानदारीतून होऊ लागली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने