शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुराचा फटका; कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २० लाख टन ऊस उत्पादन घटणार

By राजाराम लोंढे | Updated: July 29, 2024 16:35 IST

दूध घरात राहिल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात गेले सात-आठ दिवस झाले पुराचा विळखा असून, यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून, याचा सर्वाधिक फटका उसाला बसणार आहे. आगामी गळीत हंगामात किमान २० लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होणार आहे. शिरोळ, करवीर व कागल तालुक्यांतील साखर कारखान्यांना त्याची अधिक झळ बसणार असून, लाखो लिटर दूध घरात राहिल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे बसले आहे. त्यात हे दुसरे संकट उभे राहिले आहे.गेले दहा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणे मोकळी होती, तोपर्यंत पुराची दाहकता दिसत नव्हती. पण राधानगरीसह सर्वच धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने पुराचे पाणी सैरभैर झाले. नदी, ओढ्याकाठची हजारो हेक्टर पिके बघता बघता पाण्यात गेली. गेले आठ दिवस ऊस, भात, सोयाबीन ही पिके पाण्याखाली आहेत. त्यांचे नुकसान होणार आहे. मागील २०२१ च्या महापुरात जिल्ह्यातील ७४ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. त्यावेळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्या तुलनेत यंदा क्षेत्र कमी असले तरी पाणी एकसारखे शिवारात राहिल्याने नुकसान अधिक होण्याचा धोका आहे.

जिल्ह्यात ६० हजार हेक्टरपैकी उसाचे किमान ४० हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली राहिल्याने किमान २० लाख टन उसाच्या उत्पादनावर परिणाम होणार, हे निश्चित आहे.पंचनामे होणार, पण निकषाचे काय?पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर ओसरल्यानंतरच सुरू होणार आहेत. शासनाच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच भरपाई मिळते. ऊस पाण्यातून बाहेर आल्यानंतर लगेचच नुकसानाला सुरूवात होत नाही. पंधरा दिवसानंतर त्याला फुटवे फुटतात, त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या सर्वच उसाला १०० टक्के भरपाई मिळणे गरजेचे आहे.

सोयाबीन थेट कुजायलाच सुरुवातसोयाबीन पाण्याखाली गेले की ते लगेचच कुजण्यास सुरूवात करते. त्या तुलनेत भात पाच-सहा दिवस पाण्याखाली राहिले आणि त्यानंतर खताचा डोस दिला तर त्याचे किमान ५० टक्के नुकसान टाळता येऊ शकते.दुधाचे ८० लाखांचे नुकसानगेल्या सहा दिवसात ‘गोकुळ’सह इतर दूध संघांचे सुमारे १ लाख ७५ हजार लिटर दूध संकलन होऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसणार असून, उसाचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. - डॉ. अशोक पिसाळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरsugarcaneऊस