शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

उंदरवाडी फाट्याजवळ अपघातात २ जणांचा मृत्यू; तर दोघं जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 23:12 IST

दरम्यान जखमीपैकी छाया तानाजी पाटील आणि अन्वीता कांबळे  यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बोरवडे  : मुधाळ तिट्टा ते सरवडे या राज्यमार्गावरील उंदरवाडी (ता.कागल) येथील फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकीने दोन मोटरसायकलना धडक दिली.यामध्ये एका महिलेसह चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.तर अन्य दोघेजण गंभीर जखमी आहेत. त्यातील एकजण अत्यावस्थ आहे.छाया तानाजी पाटील(रा.नाधवडे,ता.भुदरगड वय अंदाजे ४५) आणि अन्वीता प्रकाश कांबळे (वय ४)अशी मृतांची नावे आहेत.आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला .

याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी त्रिलोक महादेव तांबे ( वय ४३, मूळ रा. कणेरी ता.करवीर , सध्या रा. कागल ) हे चारचाकी ( क्र. एमएच ०६ ए डब्ल्यू ६६०२ ) सरवडेकडून मुधाळ तिट्टयाकडे चालले होते. सरवडे - उंदरवाडी दरम्यान असलेल्या ओढ्यानजिक चालकाचा ताबा सुटल्याने मुधाळ तिटट्याकडून सरवडेकडे चाललेल्या दोन मोटरसायकलना गाडीने जोराची धडक दिली. 

या धडकेत पॅशन ( क्र. एमएच ०९ सीएन ५४१९ ) गाडीवरील नाधवडे ( ता. भुदरगड ) येथील जयवंत गणपती पाटील ( वय २५ ) व त्यांच्या चुलती छाया तानाजी पाटील ( वय ४५ ) हे गंभीर जखमी झाले. तर स्प्लेंडर ( क्र. एमएच ०९ एजे ४७६२ ) गाडीवरील आटेगाव ( ता. राधानगरी ) येथील प्रकाश शिवाजी कांबळे व त्यांची मुलगी अन्वीता ( वय ४ वर्षे ) हे जखमी झाले.  जखमींना रुग्णवाहिकेतून  उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर दवाखान्यात नेण्यात आले.

दरम्यान जखमीपैकी छाया तानाजी पाटील आणि अन्वीता कांबळे  यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळाचा पंचनामा मुरगूड पोलिसांनी केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. अधिक तपास मुरगूड पोलिस करत आहेत .

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर