शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वाघजाई घाटात तिहेरी अपघात; २ ठार, ६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 12:15 IST

रात्रीच्या सुमारास कागलकडे निघालेल्या मिनी टेम्पो, त्यामागे दुचाकी व त्यामागे बोलेरो गाडी कागलच्या दिशेने जात असताना समोरून शेंडूरकडून निढोरीच्या दिशेने येणारी उसाची ट्रॅक्टर-ट्राॅलीही समोरून येणाऱ्या छोटा हत्ती वाहनावर उलटली. यावेळी हा तिहेरी अपघातात झाला.

साके : कागल-निढोरी राज्यमार्गावर वाघजाई घाटात एम.एम.जी. गोठ्याजवळ गोरंबे (ता. कागल)जवळ धोकादायक वळणावर झालेल्या तिहेरी अपघातात एका महिलेसह दोन ठार, तर सहाजण जखमी झाले. रात्री आठ वाजता हा अपघात झाला. हिराबाई महादेव माने (वय ७५, सिद्धनेर्ली, ता. कागल) व दिक्षांत नितीन कांबळे (२८, शहापूर, इचलकरंजी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाघजाई घाटातील एम.एम.जी. गोठ्याजवळ असलेल्या धोकादायक वळणावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कागलकडे निघालेल्या मिनी टेम्पो, त्यामागे दुचाकी व त्यामागे बोलेरो गाडी कागलच्या दिशेने जात असताना समोरून शेंडूरकडून निढोरीच्या दिशेने येणारी उसाची ट्रॅक्टर-ट्राॅलीही समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो वाहनावर उलटली. यावेळी झालेल्या तिहेरी अपघातात मिनी टेम्पोमधील महिला हिराबाई महादेव माने, तर दुचाकीवरील दिक्षांत नितीन कांबळे हे दोघे जागीच ठार, तर इतर सहाजण जखमी झाले.

जखमींना कागल व कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात घडलेल्या ठिकाणी ऊस रस्त्यावर पडल्यामुळे वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली.तसेच अपघात ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर कागलचे पोलीस आणि पोलीस कंट्रोल ११२ चे पोलीस पोहोचल्याने ऊस बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

अपघातातील जखमींची नावे अशी : लक्ष्मण भुर्ले (वय ६५), छबू चंदुकुडे (५०), बबिता भुर्ले (५३), सौजन्या भुर्ले (११), अनिल शिंदे (३६), लताबाई भुर्ले (६५).

नवीन टेम्पोचा अपघात....

अनिल भिवाजी शिंदे हा कागल येथील नगरपालिकेच्या घंटागाडीवर चालक म्हणून काम करीत होता. त्याने नुकताच नवीन मिनी टेम्पो घेतला होता. टेम्पो घेऊन तो नातेवाइकासह बाळूमामा देवदर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन घरी कागलकडे येत असताना वाघजाई घाटात नवीन टेम्पोचा अपघात झाला. यात टेम्पोचा चक्काचूर झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलAccidentअपघात