शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कळंबा जेलमध्ये मोबाइलप्रकरणी २ तुरुंग अधिकारी, ९ कर्मचारी बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:58 IST

दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, अपर पोलिस महासंचालकांची कारवाई

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील ढिसाळ कारभार आणि कैद्यांकडे सापडलेल्या ८० हून अधिक मोबाइलप्रकरणी कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दोन अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले, तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. आणखी दोन अधिकारी आणि काही कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. एकाचवेळी अनेकांवर कारवाई झाल्याने कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.कळंबा कारागृहात सातत्याने कैद्यांकडे सापडणारे मोबाइल, गांजाचा पुरवठा, कारागृहात कैद्यांमध्ये होणारी हाणामारी, अशा घटना उघडकीस आल्यामुळे कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन श्यामकांत शेडगे यांच्याकडे अधीक्षक पदाचा कार्यभार दिला होता. शेडगे यांनी पाठविलेल्या अहवालानुसार दोन वरिष्ठ अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशाने उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या कार्यालयाकडून दोषींवर कारवाई झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.दोन अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली, तर दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आणखी दोन अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांची वरिष्ठ कार्यालयाकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. एकाचवेळी ११ कर्मचारी बडतर्फ होण्याची कळंबा कारागृहातील ही पहिलीच वेळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाई झालेले कर्मचारी मॅटमध्ये दाद मागण्याची शक्यता आहे.

यांच्यावर झाली बडतर्फीची कारवाईतुरुंग अधिकारी सोमनाथ म्हस्के आणि सतीश कदम यांच्यासह सुरक्षा कर्मचारी अभिजित गोसावी, तानाजी गायकवाड, रवी पवार, वैभव पाटील, अनिकेत आल्हाट, वैशाली पाटील, सुहास वरखडे, संजय टिपुगडे आणि स्वप्नील हांडे यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली.

भुसारे, आडे यांची बदलीतत्कालीन प्रभारी अधीक्षक पांडुरंग भुसारे यांची पुणे येथे येरवडा कारागृहात बदली झाली, तर उपअधीक्षक साहेबराव आडे यांची सोलापूर कारागृहात बदली झाली. या दोन्ही अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग