शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Kolhapur: विशाळगड तोडफोडप्रकरणी २ कोटी ८५ लाखांचे नुकसान, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 13:07 IST

फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्यास कारवाई

कोल्हापूर : विशाळगड मोहिमेच्या निमित्ताने गडासह गजापूर, मुस्लीमवाडी येथील घरे, दुचाकी-चारचाकी वाहने व सार्वजनिक मालमत्तांचे अंदाजे २ काेटी ८५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला असून घरनिहाय अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. बाधित नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी दिली.महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बाधित नागरिकांना मदत पुरविण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापूरला सामाजिक सलोख्याची परंपरा असून आपण ती अबाधित राखू, या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

१०० मिळकतींचे अतिक्रमण काढलेजिल्हाधिकारी म्हणाले, गेल्या दोन दिवसांत १०० मिळकतींचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. कारवाईनंतर अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, मलबा खाली आणले जाईल. पावसाळा असल्याने रहिवासी अतिक्रमण काढले जाणार नाही. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन अतिक्रमण काढले जात आहे. काही जणांनी स्वत:हून त्यासाठी मदत केली आहे. झालेली घटना दुर्दैवीच आहे; पण तोडफोड रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. दोषी समाजकंटकांवर कारवाई केली जाईल. मदत करणाऱ्यांना तेथे जाण्यासाठी अडवले जाणार नाही.नुकसान झालेल्या मिळकती अशाहॉटेल व घरे : ४२, दुचाकी : २८, चारचाकी : ८, सार्वजनिक मालमत्ता : २ ( प्राथमिक अंदाजित नुकसानीची रक्कम २.८५ काेटी). प्रत्येक मिळकीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तांत्रिक टीमची नियुक्ती केली असून पुढील दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत. नुकसानभरपाईसाठी हा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. यासह अल्पसंख्याक विभाग, मदत व पुनर्वसन, महसूल, गृह अशा सर्व विभागांना मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत.

म्हणून अतिक्रमण काढले नाही..विशाळगडावरील मोजक्याच मिळकतींबाबत न्यायालयाची स्थगिती होती मग अन्य अतिक्रमणे दीड वर्ष का हटवली नाही यावर जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, जून २०२३ मध्ये या विषयावरील घडामोडी झाल्या होत्या. त्यानंतर अतिक्रमण हटविण्यावर सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू होते. न्यायालयाचा स्थगिती आदेश उठल्यावरच एकत्रित कारवाई करण्याचा विचार होता; पण आता हा विषय निघाल्यावर आम्ही सरकारी वकिलांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या सल्ल्यानेच ज्या मिळकतींबाबत स्थगिती आदेश नाहीत त्या काढण्यास अडथळा नाही हे कळाल्यानंतर आम्ही कारवाई सुरू केली.

फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्यास कारवाईया प्रकरणातील आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही मुस्लीम संघटनांनी नागरिकांना कोल्हापुरात येण्याचे आवाहन केले आहे यावर जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, कोणीही याबाबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करू नये किंवा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी