शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ९६६ शाळा तंबाखूमुक्त: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 15:44 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९८० पैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या ९६६ शाळा तंबाखूमुक्त: जिल्हाधिकारी उर्वरीत शाळा लवकरच तंबाखूमुक्त करणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या एकूण १९८० पैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले.जिल्हाधिकारी कार्र्यालयात आयोजित जिल्हास्तरीय तंबाखू सनियंत्रण समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, महापालिका प्रशासन अधिकारी एस. के. यादव, राष्ट्रीय तंबाखू मुक्त कार्यक्रमाच्या समुपदेशक चारुशिला कणसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे, सलाम मुंबई फॉउडेंशनचे रवी कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा पहिल्या टप्यात तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प आहे. दुसऱ्या टप्यात माध्यमिक तसेच अन्य खाजगी शाळा तंबाखू मुक्त करण्यात येतील. तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने निश्चित केलेले ११ निकषांची जिल्ह्यातील सर्व शाळांनी काटेकोरपणे करुन आपली शाळा तंबाखूमुक्त शाळा बनवावी.चारुशिला कणसे यांनी तंबाखू नियंत्रण कायाद्यातंर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. विलास देशमुख यांनी स्वागत केले. क्रांती शिंदे यांनी आभार मानले.

जिल्ह्यातील ९६६ शाळा तंबाखूमुक्ततंबाखू नियंत्रण कायद्यातंर्गत जिल्हा परिषदेच्या १९८० शाळापैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील ६९, भूदरगडमधील ८३, चंदगड मधील १०६, गडहिंग्लजमधील ११९, गगनबावड्यातील ११, हातकणंगलेमधील १४५, कागलमधील ६९, करवीरमधील ७६, पन्हाळामधील ५६, राधानगरीमधील ३०, शाहूवाडीमधील १३८, आणि शिरोळमधील ६३ तंबाखूमुक्त शाळांचा समावेश आहे.

 

 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीkolhapurकोल्हापूरSchoolशाळाcollectorजिल्हाधिकारी