शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Kolhapur Crime: यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, अन् पैसे मिळवा; महिलेला घातला १८ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 13:09 IST

सुरुवातीला संशयिताने ६५० रुपये पाठवून तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला

जयसिंगपूर (कोल्हापूर) : ऑनलाईन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्याने जयसिंगपुरातील महिला बँक कर्मचाऱ्यास १८ लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताने तक्रारदार प्रगती महेश कुरणे (वय ३६, रा. गल्ली नं. २, जयसिंगपूर, मूळ गाव नदीवेस मिरज) यांच्याकडून आरटीजीएस, एनईएफटी, ऑनलाईनद्वारे पैसे घेऊन गंडा घातला.तक्रारदार प्रगती कुरणे यांच्या व्हाॅट्सॲपवर संशयिताने तुम्ही फ्री टास्क वापरून यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, तुम्हाला एका सबस्क्राईबला दीडशे रुपये मिळतील, असा संदेश पाठवून आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला संशयिताने ६५० रुपये पाठवून तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयिताने आणखी आमिष दाखवत प्रीपेड टास्क वापरण्यास सांगितले.यावेळी तक्रारदार यांनी आपल्या बँक खात्यावरून आरटीजीएस, एनईएफटी, यूपीए व बायो मोबाईल ॲपमधून वेगवेगळ्या बँक खात्यावर १८ लाख ६ हजार रुपये जमा केले. ही रक्कम कमिशनसह परत देतो, असे सांगून संशयिताने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर कुरणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcyber crimeसायबर क्राइमYouTubeयु ट्यूबfraudधोकेबाजी