शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र कर्जमाफीची १८ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 13:18 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींबाबत १८फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी झाली. यामध्ये इतर सर्व दाव्यांमध्ये केंद्र सरकारला नोटिसा लागू झाल्याचे मान्य करून मूळ दावा अंतिम सुनावणीसाठी ठेवला.

ठळक मुद्देअपात्र कर्जमाफीची १८ फेबु्रवारी अंतिम सुनावणी‘दौलत’ बाबत शुक्रवारी सुनावणी

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींबाबत १८ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी झाली. यामध्ये इतर सर्व दाव्यांमध्ये केंद्र सरकारला नोटिसा लागू झाल्याचे मान्य करून मूळ दावा अंतिम सुनावणीसाठी ठेवला.केंद्र सरकारने २००७-०८ मध्ये देशातील शेतकऱ्यांची ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे २७० कोटींचा लाभ झाला; पण कर्जमाफीवर तक्रारी झाल्याने ‘नाबार्ड’च्या तपासणीत जिल्हा बॅँकेशी संलग्न ४८ हजार शेतकऱ्यांची ११२ कोटींची कर्जमाफी अपात्र ठरविण्यात आली.

हे पैसे ‘नाबार्ड’ने वसूल केल्याने बॅँकेसह शेतकरी अडचणीत आले. याविरोधात जिल्हा बॅँकेने उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. अनेक वर्षांच्या लढाईनंतर उच्च न्यायालयाने ‘नाबार्ड’चे म्हणणे फेटाळून लावत या शेतकऱ्यांना पात्र ठरविले होते; पण उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ‘नाबार्ड’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत न्यायालयाने केंद्र सरकारला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते.यावर, शुक्रवारी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर सुनावणी झाली. कर्जमाफीला आव्हान देताना ‘नाबार्ड’ने न्यायालयात ७२ दावे दाखल केलेले आहेत. त्यांपैकी एका दाव्यात केंद्र सरकार हजर राहिले आहे. इतर दाव्यांमध्ये सरकारला नोटिसा लागू न झाल्याच्या कारणावरून ही सुनावणी होत नव्हती. मात्र शुक्रवारी न्यायालयाने इतर सर्व दाव्यांत केंद्र सरकारला नोटिसा लागू झाल्या आहेत, हे मान्य करून मूळ दावा अंतिम सुनावणीसाठी ठेवला आहे.

‘दौलत’ बाबत शुक्रवारी सुनावणीदौलत साखर कारखानाच्या ताब्याविरोधात ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. जिल्हा बॅँकेने कारखान्याचा बेकायदेशीररीत्या ताबा घेतला असून, या प्रकणाबाबत लवाद नेमण्याची विनंती कंपनीने केली आहे. यावर शुक्रवारी (दि. १५) सुनावणी होणार आहे. 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर