शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

१८ जिल्हा जात पडताळणी’चे अध्यक्षपद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:48 AM

विश्वास पाटील/चंद्रकांत शेळके ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जातींच्या दाखल्यांची पडताळणी करणाऱ्या राज्यातील ३६ पैकी तब्बल १८ जिल्हास्तरीय समित्यांचे अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याने पडताळणीची प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा फटका विद्यार्थी, नोकरदार आणि लोकप्रतिनिधींना बसत आहे.राज्यातील सुमारे नऊ हजार लोकप्रतिनिधींचे पद जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ...

विश्वास पाटील/चंद्रकांत शेळके ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जातींच्या दाखल्यांची पडताळणी करणाऱ्या राज्यातील ३६ पैकी तब्बल १८ जिल्हास्तरीय समित्यांचे अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याने पडताळणीची प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा फटका विद्यार्थी, नोकरदार आणि लोकप्रतिनिधींना बसत आहे.राज्यातील सुमारे नऊ हजार लोकप्रतिनिधींचे पद जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झाले आहे. त्यात कोल्हापूर महापालिकेच्या १९ नगरसेवकांचा समावेश आहे.जातप्रमाणपत्र पडताळणीस विलंब का होतो, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. सन १९९६ मध्ये माधुरी पाटील (जि.ठाणे) विरुद्ध आदिवासी कल्याण विभाग या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार राज्यात १५ विभागीय समित्या स्थापन झाल्या, परंतु शासनाने त्यांना पुरेसा स्टाफच दिला नाही. कर्मचाºयांअभावी जात पडताळणीस विलंबहोऊ लागला म्हणून २०१६ साली एकाने औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. रिक्त असलेली १९० पदे तात्काळ भरावीत व पडताळणीचे काम सोपे व्हावे यासाठी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार जिल्हास्तरीय समित्या स्थापन झाल्या; परंतु पदे भरण्याचा न्यायालयाचे आदेश सरकारने धाब्यावर बसविला. आजही १८ जिल्हा समित्यांची अध्यक्षपदे रिक्त आहेत. जिल्हास्तरीय समिती तीन सदस्यांची असते. हे निम्न न्यायिक स्वरूपाचे काम आहे. त्यामुळे तिन्ही सदस्य असल्याशिवाय दाखल्याची पडताळणी करून निकाल देता येत नाही. जात पडताळणीसाठी दररोज सुमारे ४,५०० अर्ज येतात. मात्र सदस्य संख्येअभावी समित्यांचे काम ठप्प आहे. याचाच फटका लोकप्रतिनिधींना बसला आहे.प्रमाणपत्र लागते कशासाठी..जातीचे प्रमाणपत्र शिक्षण, नोकरी व निवडणूक या तीन कारणांसाठी लागते. हे प्रमाणपत्र एकदा पडताळणी झाल्यावर ते त्याच व्यक्तीला आयुष्यभर वापरता येते. त्याच्या कुटुंबीयांनाही ते पुरावा म्हणून वापरता येते. दिल्या जाणाºया एकूण दाखल्यापैकी तब्बल ८० टक्के दाखले हे शैक्षणिक कामासाठी वापरले जातात. त्याचे नियंत्रण व समन्वय पुण्यातील बार्टी संस्थेकडून होतेजातपडताळणी संबंधी सोमवारीच पुणे विभागीय आयुक्तांकडे बैठक झाली. पडताळणी समितीची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि दाखले देण्यासाठी शासनाने शुल्क आकारावे; परंतु दाखले वेळेत द्यावेत अशी मागणी आम्ही केली आहे.राजेंद्र कोंढरे, सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघअध्यक्षपद रिक्त असलेले १८ जिल्हेसांगली, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, मुंबई उपनगर, धुळे, जळगाव, बीड, जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली.१९ जिल्ह्यात सचिव पद रिक्तअध्यक्ष व सदस्य सचिव ही जातपडताळणी समितीची महत्त्वाची पदे आहेत; परंतु १९ जिल्ह्यात सदस्य सचिव हे पदही रिक्त आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर.जिल्हा अध्यक्ष १८संशोधन अधिकारी २४समिती सदस्य सचिव १९वरिष्ठ स्टेनो २२विधि अधिकारी २२