शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

‘सीए’ परीक्षेत कोल्हापूरच्या १८ जणांची बाजी ; निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 11:53 IST

दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट्स आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला. त्यातील अंतिम परीक्षेत कोल्हापूरच्या १८जणांनी यश मिळवीत बाजी मारली. त्यात ताराबाई पार्कमधील वरुण अमर दीक्षित याने देशात ३५ वा क्रमांक मिळविला आहे.

ठळक मुद्दे‘सीए’ परीक्षेत कोल्हापूरच्या १८ जणांची बाजी ; निकाल जाहीरवरुण दीक्षित देशात ३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

कोल्हापूर : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट्स आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला. त्यातील अंतिम परीक्षेत कोल्हापूरच्या १८जणांनी यश मिळवीत बाजी मारली. त्यात ताराबाई पार्कमधील वरुण अमर दीक्षित याने देशात ३५ वा क्रमांक मिळविला आहे.चार्टर्ड अकौंटंटच्या अंतिम परीक्षेत ताराबाई पार्कमधील आदित्य कॉर्नर परिसरात राहणाऱ्या वरुण दीक्षित याने ८०० पैकी ५१४ गुणांची कमाई करीत देशात ३५ वा क्रमांक मिळविला. त्याचे वडील अमर आणि आई नेत्रा यादेखील सी. ए. आहेत. वरुण याने कॉमर्स कॉलेजमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बी. कॉम. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. पदवीचे शिक्षण घेत त्याने पुणे येथे सी. ए.साठीची इंटर्नशिप पूर्ण केली. त्याने पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेमध्ये यश मिळविले आहे.

कोल्हापूरमधील निकिता जाधव, स्वप्निल वैद्य, शुभम हारगुडे, चिन्मय कुलकर्णी, प्रीती हरचंदानी, प्रणव परुळेकर, सुहास पाटील, निखिल फाटक, विनायक रेलेकर, बाबूराव बागल, अजय मलानी, सोनिया रायगांधी, वैष्णवी संकपाळ, अक्षय लोहार, मयूरी दुल्लानी, नेहा बासंतानी, अश्विनी खुडे यांनी अंतिम परीक्षेत यश मिळविले आहे. दरम्यान, सीए फौंडेशन परीक्षेत विजय हिंदुजा, ऋषभ जेसवानी, आशिष कारीरा, भावेश पटेल, पौर्णिमा वारके, नमीरा मैंदर्गी, निशांत चावला, कृतिका चावला, वर्षा तांबे, विपुल निरंकारी, तर ‘सीए सीपीटी’ परीक्षेमध्ये प्रणव वरणे, शिवानी सूर्यवंशी, आकांक्षा पाटील उत्तीर्ण झाले.

या परीक्षेतील यशासाठी केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचा खूप आनंद वाटत आहे. अभ्यासातील सातत्याच्या जोरावर यशाचे शिखर गाठता आले. परीक्षेसाठीच्या शेवटच्या पाच महिन्यांत दिवसातील १0 तास अभ्यास केला. माझ्या यशात आई-वडील, आजी, शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.- वरुण दीक्षित.

 

‘सीए’ परीक्षेत यशस्वी झालेल्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी वाढली आहे. ती आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टामुळेच या परीक्षेतील कोल्हापूरचा टक्का वाढला आहे.- नवीन महाजन,अध्यक्ष, इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट्स आॅफ इंडिया, कोल्हापूर शाखा.

 

 

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूर