शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

मुख्यमंत्री रोजगारातून १७९२ जणांची ‘उद्योगभरारी’; कोल्हापूर राज्यात अव्वल

By पोपट केशव पवार | Updated: December 17, 2024 12:00 IST

पोपट पवार कोल्हापूर : तरुण-तरुणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) ही ...

पोपट पवारकोल्हापूर : तरुण-तरुणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) ही योजना कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरली असून, या योजनेमुळे दोन वर्षांत जिल्ह्यात १७९२ जणांनी स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारून रोजगार निर्मितीला चालना दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेत सर्वाधिक लाभार्थी, सर्वाधिक अनुदान व दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्य सरकारने २०१९ मध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेची सुरुवात केली. प्रक्रिया व निर्मिती उत्पादन प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांपर्यंत, तर सेवा उद्योगसाठी २० ला रुपयांपर्यंतच्या प्रकल्पावर राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. यामध्ये ७६ उद्योगांचा व सेवांचा समावेश आहे. यामध्ये वैयक्तिक व बचत गटाच्या माध्यमातून उभा केलेल्या उद्योगांनाही अर्ज करता येतो.या योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता १८ ते ४५ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते. या योजनेसाठी शहरी व ग्रामीण असे दोन प्रवर्ग तयार केले असून, त्यासाठी १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. २०२३-२४ या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात ११११ तरुण-तरुणींना या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळाले आहे, तर २०२४-२५ या वर्षात आतापर्यंत ६८१ जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या दोन्ही वर्षांत मिळून या लाभार्थ्यांना ८२ कोटी रुपयांहून अधिक अनुदान मंजूर झाले आहे.

दृष्टीक्षेपात सीएमईजीपी योजनेची आकडेवारीवर्षे - अर्ज - उद्दिष्ट्य - लाभ - अनुदान मंजूर२०२३-२४ - ३२७८ - १११० - ११११ - ४० कोटी२०२४-२५ - १९८२ - १२०० - ६८१ - ४२ कोटी

दहा टक्के भागभांडवलावर सुरू करता येतो उद्योगया योजनेत एकूण गुंतवणुकीत उद्योजकाचा वाटा हा ५ ते १० टक्के, सरकारचे अनुदान १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत आणि बँकेकडून ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते. सुरुवातीला अर्ज केल्यानंतर जिल्हा कार्यबल समितीकडून मंजुरी दिली जाते. त्यानंतर अर्ज सरकारी बँक, खासगी बँक व सहकारी बँकेकडे पाठवला जातो. अर्ज मंजूर झाल्यानंतर उद्योजकाला कर्जाची रक्कम उपलब्ध होते. मात्र, तीन वर्षांपर्यंत उद्योग सुरू राहिला, तरच सरकारच्या वतीने दिले जाणारे अनुदान लाभार्थ्याला मिळू शकते.

कोणत्या उद्योग-व्यवसायासाठी मिळते कर्ज

  • उत्पादन
  • सेवा उद्योग
  • कृषी पूरक व्यवसाय
  • कृषीवर आधारित उद्योग
  • ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय
  • फिरते विक्री केंद्र- खाद्यान्न केंद्र

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण-तरुणींना उद्योग व्यवसायासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचे उद्दिष्ट्य, लाभार्थी व अनुदान देण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल आहे. - अजयकुमार पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर