शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: शिकारीच्या उद्देशाने १७३ गावठी बॉम्ब जंगलात ठेवले, वनविभागाने जप्त केले; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:27 IST

जंगलाच्या आतल्या भागात फिरताना दिसले

कडगाव : भुदरगड तालुक्यातील कडगाव वनपरिक्षेत्रातील म्हासरंग येथील जंगल परिसरात संशयास्पद हालचाली करत फिरणाऱ्या दिल बहादूर सिंग (वय ४६) रा.बिजवाडा हल्लीपिलकी कॅम्प सदाशिव पुरा सिमोगा कर्नाटक व राजाराम बापू देसाई (६५, रा. पाळ्याचा हुडा (ता. भुदरगड) या दोघांना वनपथकाने ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता १७३ गावठी जिवंत बॉम्बसह चाकू, कोयता मोबाइल हँडसेट वन विभागाने जप्त केले.म्हासरंग येथील वन परिसरात गस्तीदरम्यान पथकाला हे दोघे जंगलाच्या आतल्या भागात फिरताना दिसले. थांबवून विचारपूस केल्यानंतर त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने तपासणी केली असता त्यांनी जंगलातील पायवाटेने ठिकठिकाणी गावठी बॉम्ब ठेवले असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता मोठ्या प्रमाणावर स्फोटक सामग्री सापडली. प्राथमिक चौकशीत या स्फोटकांचा उपयोग जंगली प्राण्यांच्या अवैध शिकारीसाठी होणार असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.या कारवाईनंतर पथकाने दोघांना तत्काळ अटक करून पुढील तपासासाठी वन विभागाच्या कार्यालयात हलवले. वनपरिसरातील बिबट्या, ससे, रानडुक्कर व अन्य वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने मागील काही महिन्यांपासून विशेष मोहीम सुरू केली आहे.

अधिक तपास उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहायक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडगाव वनक्षेत्रपाल राजेश चौगुले, वनपाल दत्तात्रय जाधव, वनरक्षक गणेश लोकरे, दत्ता होनमने, उमा पाटील, विजय शिंदे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 173 bombs seized in Kolhapur forest; two arrested for hunting.

Web Summary : Forest officials arrested two individuals near Mhasrang, Kolhapur, seizing 173 live bombs, knives, and a mobile phone. The explosives were intended for illegal wildlife hunting. An investigation is underway to protect local wildlife.