कोल्हापूर जिल्ह्यातील भूस्खलन होणाऱ्या १७ गावांमध्ये ‘दक्षता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 01:17 AM2019-07-05T01:17:55+5:302019-07-05T01:19:59+5:30

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटण्याची दुर्घटना व करवीर तालुक्यातील शिपेकरवाडी येथील दरड कोसळण्याचा प्रकार यांमुळे जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे.

 17 villages in Kolhapur district are 'vulnerability' | कोल्हापूर जिल्ह्यातील भूस्खलन होणाऱ्या १७ गावांमध्ये ‘दक्षता’

कोल्हापूर जिल्ह्यातील भूस्खलन होणाऱ्या १७ गावांमध्ये ‘दक्षता’

Next
ठळक मुद्देया ठिकाणी २४ तास लक्ष द्यावे, असे कळविले आहे.

कोल्हापूर : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटण्याची दुर्घटना व करवीर तालुक्यातील शिपेकरवाडी येथील दरड कोसळण्याचा प्रकार यांमुळे जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे. जिल्ह्णातील भूस्खलन होणाºया १७ गावांमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व कोतवालांना गावातच थांबण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्णातील मातीच्या धरणांसह इतर धरणांवरील शाखा व उपअभियंत्यांशी थेट संपर्क करून यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

बुधवारी (दि. ३) चिपळूण (जि. रत्नागिरी) तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाली; त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्णातील धरणांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय श्ािंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या माध्यमातून महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागांना दक्षतेचे आदेश दिले. यावेळी प्रत्येक धरणावरील शाखा, उपअभियंत्यांना तिवरे धरणाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून अधिक काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच करवीर तालुक्यातील शिपेकरवाडी येथील दरड कोसळण्याची घटनाही ताजीच आहे. त्यामुळे जिल्ह्णातील भूस्खलनाच्या यादीत असणाºया गावांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरड कोसळण्यासारखे प्रकार घडल्यास ती बाजूला काढण्यासाठी जेसीबी यंत्रणा सज्ज ठेवावी; तसेच आवश्यक त्या ठिकाणी दरडीभोवती जाळ्या बसवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. बांधकाम विभाग, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागालाही दरड कोसळणारी ठिकाणे निश्चित करून तेथे २४ तास लक्ष ठेवावे, असे निर्देश दिले आहेत.

संभाव्य भूस्खलन यादीतील तालुकानिहाय गावे अशी
करवीर : शिपेकरवाडी (बोलोली), वाशी, महे, पन्हाळा : मौजे मराठवाडी, शाहूवाडी : उखळूपैकी खोतवाडी, राधानगरी : बुजवडे, गगनबावडा : साळवण, तिसंगीपैकी बालेवाडी, मार्गेवाडी, भुदरगड : पडखंबेपैकी खोतवाडी, पडखंबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कारिवडेपैकी हाणफोडेवाडी, टिक्केवाडी, ममदापूर., गडहिंग्लज : चिचेवाडी

जिल्ह्यातील भूस्खलन होणाºया गावांतील यंत्रणा व धरणांच्या सुरक्षेबाबत संंबंधित विभागांना दक्षतेचे आदेश दिले आहे. या ठिकाणी २४ तास लक्ष द्यावे, असे कळविले आहे.
- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी
 

दुर्घटना होऊ नये यासाठी दक्षता घेण्यासंदर्भात संबंधित विभागांना असे जिल्हा प्रशासनातर्फे निर्देश दिले आहेत. तसेच दुर्घटना घडल्यास तत्काळ मदतकार्य करता येण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही निर्देश दिले आहेत.
- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

ॅजिल्ह्णातील मोठ्या, मध्यम व लघू अशा ६७ धरणांच्या स्थितीबाबत मान्सूनपूर्व पाहणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पांचे स्ट्रक्चरल आॅडिटही झाले असून, हे प्रकल्प भक्कम व सुरक्षित असल्याचा अहवाल आहे.
- आर. बी. बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर.

 

Web Title:  17 villages in Kolhapur district are 'vulnerability'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.