शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

नागरी बँकांच्या ठेवीत १७ अब्जांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:53 IST

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ नागरी सहकारी बँकांपैकी ४६ नागरी बँका नफ्यात असून, त्यांच्या एकूण ठेवीत तब्बल १७ अब्ज २८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकूण ठेवी ११,२५९ कोटी झाल्या आहेत.

ठळक मुद्दे संडे अँकर । ग्राहकांचा विश्वास वाढला : वर्षभरात उघडल्या २३ नवीन शाखा, ८१ कोटी रुपयांचा नफा

- रमेश पाटील ।कोल्हापूर : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ नागरी सहकारी बँकांपैकी ४६ नागरी बँका नफ्यात असून, त्यांच्या एकूण ठेवीत तब्बल १७ अब्ज २८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकूण ठेवी ११,२५९ कोटी झाल्या आहेत. वाढलेल्या ठेवी या नागरी बँकांवर ग्राहकांनी टाकलेला दृढ ‘विश्वासाचे’ प्रतीक मानले जात आहे.

जिल्ह्यातील नागरी बँकांना यावर्षी ८१ कोटी रुपयांचा नफा झाला. गतसाली तो ७० कोटींच्या घरात होता. नफ्यात १० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गतसालापेक्षा यंदा ६९९ कोटी रुपयांची जादा कर्जे दिल्याने तसेच त्या कर्जाची योग्य पद्धतीने वसुली केल्याने बँकांना हा नफा झालेला आहे. या बँकांनी कर्ज देताना पुरेसे तारण घेऊन, तसेच कागदपत्रांची खातरजमा करूनच कर्जे दिल्याने दिलेल्या कर्जाची वसुली वेळेत आणि चांगली झाली आहे. नफ्याचे प्रमाण पाहता लहान बँकांना पन्नास लाखांच्या वरती, तर मध्यम व मोठ्या बँकांना एक ते पाच कोटींच्या वर नफा झालेला आहे. अडचणीत असलेल्या युथ बँकेनेही आता थकीत कर्जाच्या वसुलीला जोर लावला आहे. नागरी बँकांपैकी निम्म्याहून अधिक बँकांचा एनपीए शुन्य टक्के आहे. तर उर्वरित बँकांचा एक ते पाच टक्क्यांच्या घरात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या एनपीएमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच नागरी बँकांचा एनपीए कमी होऊन शून्य टक्क्यांवर आला आहे.१८ हजार कोटींचा व्यवसायनागरी बँकांनी यंदा १७ हजार ९५८ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे, तर चार हजार १३४ कोटी रुपयांची विविध खात्यांमध्ये, तसेच सरकारी रोख्यांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार गुंतवणूक केली आहे. नागरी बँकांच्या जिल्ह्यात एकूण शाखा ४९० च्या घरात पोहोचल्या आहेत. तसेच वर्षभरात विविध बँकांनी नवीन ८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

जिल्ह्यातील सर्व नागरी बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणारी चांगली सेवा आणि बँकांबाबतची वाढत चाललेली विश्वासार्हता या जोरावर नागरी बँकांच्या ठेवीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. - निपुण कोरे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हानागरी बँक असोसिएशन.नागरी बँका राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देत आल्या आहेत. त्यामुळे नागरी बँकांच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे.- अनिल नागराळे,मुख्य कार्यकारी अधिकारी,कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन.

टॅग्स :MONEYपैसाbankबँक