शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कोल्हापूर जिल्ह्यातील १६६८ वीज बिल थकबाकीदारांची ‘बत्ती गुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:28 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १६६८ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून धडक कारवाई करून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ८२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील १६६८ वीज बिल थकबाकीदारांची ‘बत्ती गुल’महावितरणची धडक कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १६६८ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून धडक कारवाई करून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ८२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात महावितरणने थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी व हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. वीजग्राहकांकडे महावितरणच्या मासिक वीजबिलांचा एक रुपयाही थकीत राहणार नाही. या ध्येयाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत संबंधित थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडितच करण्याचे निर्देश सर्व अधिकारी व जनमित्रांना देण्यात आलेले आहेत. गेल्या काही महिन्यांतील वाढत्या थकबाकीची गंभीर दखल घेऊन थकबाकी वसुलीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयनिहाय थकबाकी व होणारी वसुली यांचे दैनंदिन पर्यवेक्षण वरिष्ठ पातळीवरून सुरू करण्यात आले आहे.घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये थकबाकीदार असणाऱ्या जिल्ह्यातील १६६८ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये ८२८ जणांचा कायमस्वरूपी, तर ८४० जणांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला.वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदाराने अनधिकृतपणे वीजवापर केल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.वीज बिल भरणा केंद्रे आज, उद्या सुरू राहणारदरम्यान, थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ह्यमहावितरणह्णची कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत स्थानिक वीजबिल भरणा केंद्रे आज, शनिवारी व उद्या, रविवारी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. याशिवाय घरबसल्या आॅनलाईन पेमेंटसाठी महावितरणने वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन सोय उपलब्ध केली आहे.

 

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर