शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकांसह १६ जणांनी केला भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:26 IST

अभिषेक बोंद्रे आणि जनसुराज्यचे विधानसभेचे करवीर मतदारसंघातील उमेदवार संताजी घोरपडे यांचाही समावेश

कोल्हापूर : येथील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यासह अनेकांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये बोंद्रे घराण्यातील अभिषेक बोंद्रे आणि जनसुराज्यचे विधानसभेचे करवीर मतदारसंघातील उमेदवार संताजी घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांचाही समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे भाजपचा मफलर गळयात घालून स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील एकूण १६ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार आणि त्यांच्या पत्नी सरस्वती पवार, शिवाजी पेठेतील प्रमुख कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे, विधानसभा निवडणूक लढवलेले संताजी घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनात्मक बांधणी आणि खर्‍या कार्यकर्त्याला न्याय देणार्‍या भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत असली तरी कुणावरही अन्याय होवू देणार नाही असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात रिक्षा संघटनेचे नेते राजेंद्र थोरवडे, वैभव राजेभोसले, सुशांत सावंत, अभिजीत माने, दिपक खांडेकर, मंदार राऊत, संकेत रूद्र, विलास इंदप, देवेश कुबल, सुदर्शन वोरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.