शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विकास सेवा संस्थांचे काम गतिमान होणार, संगणकीकरणासाठी १५३ कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 17:37 IST

गावपातळीवरील या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर कृषी कर्ज पुरवठा करण्याचे काम गेले अनेक वर्षे या संस्थांच्या माध्यमातून होत आले आहे.

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा म्हणजेच विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणासाठी १५३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून तो पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज पुरवठा करण्यात त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संरचनेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. गावपातळीवरील या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर कृषी कर्ज पुरवठा करण्याचे काम गेले अनेक वर्षे या संस्थांच्या माध्यमातून होत आले आहे.केंद्र सरकारने २९ जून २०२२ रोजी केंद्रपुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या हिश्श्याचे १५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यात ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अंतर्गत असलेल्या २० हजार ९८६ सेवा संस्था कार्यरत आहेत. यातील १२ हजार संस्थांचे पहिल्या टप्प्यात संगणकीकरण होणार आहे.या संस्थांच्या माध्यमातून सभासदांना संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे विविध सेवा पुरवण्याचा शासनाचा मानस असून यामुळे वार्षिक हिशोब, सुलभ कर्ज पुरवठा, निर्दोष कर्ज वसुली आणि गैरकारभारावर नियंत्रण यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

राज्यातील कृषी कर्ज पुरवठा

सन                 शेतकरी संख्या            झालेला पीक कर्ज पुरवठा२०२१/२२      ५४ लाख ४ हजार         ४८ हजार ९०८ कोटी रुपये[यातील १८ हजार ४१७ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा सेवा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याचाच अर्थ ६० टक्के शेतकरी या कर्जासाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांवर अवलंबून आहेत.]            

सध्या कर्ज पुरवठ्यापासून ते वसुलीपर्यंतची सर्व माहिती संकलित करताना मनुष्यबळाचा वापर होता. त्यामुळे माहिती संकलनामध्ये विलंब होतो. सेवा संस्थांच्या संगणकीकरणामुळे ही माहिती विनाविलंब मिळेल. त्यामध्ये एकवाक्यता राहील. महत्त्वाचे म्हणजे रोजची माहिती रोजच भरावी लागणार असल्यामुळे गैरकारभारावरही नियंत्रण येऊ शकेल. -डॉ. ए. बी. माने, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर