शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मला अडकविण्यासाठी महिलांना १५ कोटींचे आमिष, आमदार प्रकाश आवाडेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 17:03 IST

गुंड संजय तेलनाडे याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्यासाठी महिलांना १५ कोटी रुपयांचे आमिष दाखवले

इचलकरंजी : दुहेरी मोक्क्यातील गुंड संजय तेलनाडे याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्यासाठी महिलांना १५ कोटी रुपयांचे आमिष दाखवले, असा मुद्दा आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात आवाडे यांनी लक्षवेधी सादर केली होती. या लक्षवेधीवर बोलताना ते म्हणाले, भ्रष्टाचाराच्या प्रकरणामागे मी लागलो आहे, असे कळाल्यानंतर मला अडकविण्यासाठी त्या गुंडाने महिलांना १५ कोटी रुपयांचे आमिष दाखवले. माझ्यावर खोटी फिर्याद करा, काही तरी आरोप करा आणि अडकवा, अशा सूचना देण्यात आल्या. जर तुम्हाला शिक्षा झालीच, तर तीन ते चार महिने होईल. त्यानंतर तुम्ही सुटाल. मात्र, तुम्हाला १५ कोटी रुपये मिळतील, असे त्या महिलांना सांगून माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भातील माहिती लेखी स्वरुपात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबंधित महिलेचे पत्र आणि माझे पत्र जोडून दिले आहे. या दोघांवर कारवाई करण्याची मी विनंती करीत आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही या सभागृहात येत आहोत. सन १९८५ सालापासून मी या सभागृहाचा सदस्य आहे. तीनवेळा राज्यमंत्री व एक वेळा मंत्रिपद भूषवले आहे. माझ्या त्रागावरून हे प्रकरण किती गंभीर आहे, हे आपल्या लक्षात येईल. आर्थिक गुन्हे शाखा अथवा ईडी यंत्रणेमार्फत याची चौकशी व्हावी.मंत्री सामंत म्हणाले, आवाडे यांनी सांगितलेली बाब गंभीर आहे. त्यांनी जी नावे घेतली आहेत, त्यांच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल आहेत. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यांच्यावर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी केली जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash Awadeप्रकाश आवाडे