शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अकरा जिल्हा बँकांत १४७ कोटीच्या जुन्या नोटा पडून; नोटाबंदी वैध, शिल्लक नोटांचा निकाल कधी?

By राजाराम लोंढे | Updated: January 6, 2023 14:47 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २५ कोटी पडून

राजाराम लोंढे कोल्हापूर : नोटाबंदीनंतर गेली पाच वर्षे महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेशसह पाच राज्यातील ११ जिल्हा बँकांत १४७ कोटी ५३ लाखांच्या जुन्या नोटा अक्षरशा धूळ खात पडून आहेत. याविरोधात बँकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असली तरी अद्याप त्यावर काहीच निर्णय न झाल्याने या बँकांना वर्षाला कोट्यवधीचा फटका बसत आहे.केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये केलेली नोटाबंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सोमवारी नोटाबंदी योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवल्याने आता शिल्लक नोटाबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे बँकांचे लक्ष आहे.काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले, मात्र यातून केंद्र सरकारच्या हाताला फारसे लागले नाही.

रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना ग्राहकांकडून येणाऱ्या पाचशे व एक हजाराच्या नोटा बदलून देण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी ५२ दिवसांचा कालावधीही दिला होता. त्यानुसार बँकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना पैसे बदलून दिले. जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा जमा झाल्यानंतर त्या परत घेण्याची प्रक्रियाही रिझर्व्ह बँकेने राबवली मात्र देशातील अकरा जिल्हा बँकांकडे जमा झालेली सगळी रक्कम रिझर्व्ह बँकेने परत घेतली नाही.

गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातील अकरा जिल्हा बँका यामध्ये अडकल्या आहेत. त्यांच्याकडे पाचशे व एक हजार रुपयांच्या १४७ कोटी ५३ लाखांच्या नोटा पडून आहेत. याविरोधात या जिल्हा बँकांनी २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. न्यायालयाने नोटाबंदी वैध ठरवल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.केडीसीसी बँकेत २५ कोटी पडूनकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (केडीसीसी) सुमारे २७५ कोटीच्या जुन्या नोटा आल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने त्यातील २५४ कोटीच्या बदलून दिल्या, तर २५ कोटी रकमेच्या नोटा पाच वर्षे पडून आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNote Banनोटाबंदीbankबँक