शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने ही महत्वपूर्ण भूमिका बजावली...१४५० मालवाहतूक रेल्वेने पोहोचले अत्यावश्यक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:29 IST

संपूर्ण देशात आवश्यक वस्तूंचे लोडींग अनलोडिंग करणे या बाबीला प्राधान्य देण्याची भारतीय रेल्वेची नीती आहे, तिला अनुसरून पुणे रेल्वे मंडळ कार्य करत आहे. मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा यांनी सर्व हितधारकांना आश्वासन दिले आहे की सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लॉक डाऊन च्या वाढलेल्या काळात देखील रेल्वेची सेवा निरंतर चालू राहील.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लॉकडाऊन च्या वाढलेल्या काळात देखील रेल्वेची सेवा चालू राहील--मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा

कोल्हापूर : कोविड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन लागू झाल्याने देश जणू काही थांबला आहे. या लॉक डाऊन च्या कठीण काळात राष्ट्रीय ट्रान्सपोर्टर भारतीय रेल्वे पुणे, सातारा ,कोल्हापूर आणि देशाच्या इतर भागात पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मालगाड्या चालवीत आहे. पुणे रेल्वे मंडळाने लॉक डाऊन च्या या काळात 1450 मालगाड्या अत्यंत कुशलता व गतीने चालवल्या आहेत.

मंडळावर 25 मार्च ते 26 एप्रिल पर्यंत 27 रेक म्हणजे 1 लाख टनांहून अधिक खाद्यान्नाची अनलोडिंग झाली. हे अनलोडिंग पुणे, बारामती, कोल्हापूर, मिरज व सातारा येथील माल गोदामात केले गेले जे खाद्य वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त मंडळाने या भागात एलपीजी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे 15 रेक एलपीजी अनलोडींग केले जे 15लाख सिलेंडर समकक्ष आहे. याव्यतिरिक्त राज्य सरकार सोबत समन्वय ठेवून लॉक डाऊन च्या या काळात कृषी खत 21 रेक, सिमेंट 9 रेक, लोखंड व स्टीलचे 9 रेक व मीठ 1 रेक असे पुणे रेल्वे मंडळाच्या विविध टर्मिनल वर उतरवले आहे.

मंडळाच्या लोणी स्टेशन येथून पेट्रोलियम उत्पादनाचे 18 रेक (9लाख लिटर्स पेट्रोलियम उत्पादन) बंगलोर, मंगळूर, सोलापूर, नवलूर, जबलपूर, सागर या ठिकाणी पाठवले गेले. बारामती स्टेशन येथून 3500 टन साखर तामिळनाडूतील दिंडीगुल व जवळील क्षेत्रात पाठवली गेली. कोल्हापूर स्टेशन येथून साखरेचे 3 रेक निर्यातीसाठी पाठवले गेले. याच बरोबर कृषी खत ,पेट्रोलियम उत्पादन ,साखर ,सिमेंट आणि ड्राय ऑइल केक सारख्या अत्यावश्यक वस्तू उत्पादन , उत्तर क्षेत्रामधून दक्षिण क्षेत्रामध्ये खाद्यान्न वेळेवर पोहोचविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत.

यासाठी स्टेशन मास्टर, पॉइंट्समन, गार्ड ,लोको पायलट ,कंट्रोलर इत्यादी कामगार वर्ग मालगाड्यांचे संचालन व रेल्वेची चाके सदैव गतीमान ठेवण्यासाठी 24 तास काम करीत आहेत . मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा यांनी सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लॉक डाऊन च्या वाढलेल्या काळात देखील रेल्वेची सेवा निरंतर चालू राहील असा विश्वास दिला असल्याचे रेल्वेचे पुणे विभगाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या