शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'विदेशी'चा वाढला दर, मद्यपींच्या हातात देशी अन् बिअर!; गोवा बनावटीसह गावठी दारू रोखण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:58 IST

देशी अन् बीअरच्या विक्रीत तेजी, लक्षणीय वाढ

कोल्हापूर : राज्य सरकारने विदेशी दारूच्या दरामध्ये ३० ते ५० टक्क्यांची वाढ केल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत विदेशी दारूच्या विक्रीत १४ टक्के घट झाली. बीअर आणि देशी दारूची दरवाढ कमी असल्याने त्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. विदेशीच्या दरवाढीमुळे गावठी आणि गोवामेड दारूची तस्करी वाढत आहे. तस्करी रोखण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.महसूल वाढीसाठी राज्य सरकारने जुलै २०२५पासून देशी आणि विदेशी दारूच्या विक्रीत दरवाढ केली. देशी दारूसह बीअरच्या दरात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली, तर विस्की, रम, वाइन अशा विदेशी दारूच्या दरात सुमारे ३० ते ५० टक्क्यांची वाढ झाली.दरवाढीनंतर पहिल्या तिमाहीत विदेशी दारूच्या विक्रीत १४ टक्क्यांची घट झाली. यामुळे राज्याला मिळणाऱ्या महसुलावर परिणाम होत आहे. दुसरीकडे बीअर आणि देशी दारूची दरवाढ मर्यादित असल्याने ग्राहकांनी याला पसंती दिली. बीअरच्या विक्रीत १७ टक्क्यांची वाढ झाली, तर देशीच्या विक्रीत सहा टक्क्यांची वाढ झाली.गांधी सप्ताहात १५३ कारवायादोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरदरम्यान गांधी सप्ताहाच्या निमित्ताने दारू तस्करांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात १५३ कारवाया करून १३२ जणांवर गुन्हे नोंद केले. ३० वाहनांसह ४५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.

नऊ महिन्यांत साडेपाच कोटींचा मुद्देमाल जप्तजानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात बेकायदेशीर दारू तस्करी, विक्री आणि निर्मितीचे २०२८ गुन्हे दाखल झाले. यात १९१७ आरोपींना अटक झाली, तर १५५ वाहने जप्त केली. दारू आणि वाहने असा पाच कोटी ६८ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल पथकांनी जप्त केला. यापैकी ११ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने एक ते २५ हजारांपर्यंत दंडात्मक शिक्षा केल्या.

गोवा बनावटीच्या दारूचे ७६ गुन्हेगेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर ७६ कारवाया झाल्या. यातील ८९ आरोपींना अटक करून ३० वाहने जप्त केली. सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गावठीचा धोका वाढलादेशी-विदेशी दारूचे दर वाढल्याने गावठी हातभट्टीच्या दारूची मागणी वाढत आहे. यामुळे गावठी दारूची छुपी निर्मिती, वाहतूक आणि विक्री वाढण्याचा धोका आहे. हा प्रकार रोखण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.

गेल्या सहा महिन्यात १ कोटी ४० लाख लिटर दारू रिचवली

  • देशी - ५२ लाख ३२ हजार लिटर
  • विदेशी - ५० लाख ९७ हजार लिटर
  • बीअर - ३७ लाख ३१ हजार लिटर
English
हिंदी सारांश
Web Title : Foreign Liquor Price Hike: Locals, Beer Up; Illicit Liquor Rises!

Web Summary : Foreign liquor price increase in Kolhapur led to decreased sales. Beer and local liquor consumption rose. Illicit liquor smuggling increased, posing challenges for authorities. Raids intensified.