शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘सहा तासांत पुणे’साठी १३५ रुपये टोल!

By admin | Updated: November 17, 2015 00:05 IST

महामार्गापेक्षा पायवाट बरी : सहापदरीकरणाच्या कामामुळे रस्ता खड्ड्यात; विकतच्या दुखण्यामुळे प्रवासी-वाहनधारक संतप्त--हाय काय... ‘न्हाय’ काय?

महेंद्र गायकवाड -- पाचवड पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे कमी वेळेत अन् सुखाचा प्रवास होत असतानाच महामार्ग प्राधिकरणाने (न्हाय) सहापदरीकरणाचा घाट घातला अन् महामार्ग अक्षरश: खड्ड्यात गेला. लिंब फाटा ते वेळेदरम्यान सध्या तब्बल आठ उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. ठिकठिकाणी वाहतूक वळविली असल्याने खड्ड्यातून मार्ग काढताना असल्या महामार्गापेक्षा गावाकडची पायवाट बरी असे म्हणण्याची वेळ येत आहे. सातारा ते पुणे या सहा तासांच्या प्रवासासाठी १३५ रुपये टोलही भरावा लागतोय. हे विकतचं दुखणं कशासाठी सहन करायचं? हा संतप्त सवाल आहे प्रवासी व वाहनधारकाचा. रविवारी झालेला मेगाब्लॉक हा ‘न्हाय’च्या गचाळ कामाचे फलित असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम आॅगस्ट महिन्यापासून वेगाने सुरू झाले. परंतु ठेकेदारांनी सहापदरीकरण कामाचे योग्य नियोजन न करता उड्डाणपुलांची कामे हाती घेतल्याने सर्वच कामे अपूर्णावस्थेत आहेत. लिंंब फाटा ते वेळे दरम्यानच सुमारे आठ उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यामध्ये अनुक्रमे लिंंब फाटा, आनेवाडी, उडतारे, पाचवड, भुर्इंज, जोशी विहीर, बोपेगाव आणि सुरूर या मोठ्या रहदारी असलेल्या गावांचा समावेश होतो. ही आठही ठिकाणे महामार्गावरील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाची असून येथे मोठ्या प्रमाणात महामार्गावर प्रवाशांची रहदारी सुरू असते. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे आजपर्यंत यापैकी एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसून त्याठिकाणची वाहतूक सुरळीत झालेली दिसून येत नाही. (क्रमश:) मेगाब्लॉकने प्रवाशांना अक्षरश: रडविलेगावाकडे दिवाळीच्या सुटीचा आनंद घेऊन पुणे-मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना रविवारी महामार्गावर झालेल्या मेगाब्लॉकने अक्षरश: रडविले. लिंबखिंड ते पाचवड या दहा किलोमीटर अंतरात वाहतूक जाम झाली. वाहतूक सुरळीत व्हायला पहाट झाली. तोपर्यंत लहान मुले, वृद्धांसह सर्वच प्रवासी, वाहनचालकांचे मोठे हाल झाले. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘न्हाय’वर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.कारणाविना झाली वाहतूक कोंडीरविवारी महामार्गावर झालेला मेगाब्लॉक हा महामार्ग प्राधिकरणाच्या आडमुठेपणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. महामार्गावर अशी कोणतीच घटना घडली नव्हती की ज्यामुळे एवढी मोठी वाहतूक कोंडी होईल. निव्वळ ‘न्हाय’ने सुरु केलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे ही समस्या उद्भवली आणि त्याचा त्रास हजारो प्रवाशांना सहन करावा लागला. राष्ट्रीय महामार्ग तयार करून अच्छे दिन आणणाऱ्या राज्य सरकारचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पाचवडमध्ये दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी पाचवड : राष्ट्रीय महामार्गावरील शनिवारपासून विस्कटलेली वाहतूक आजपर्यंत काही सुरळीत झालेली नाही. पाचवड ते उडतारेपर्यंत आजही (दि. १६) दुपारनंतर वाहतुकीचा फज्जा उडाला. महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या नियोजनाअभावी व ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तीन दिवसांपासून प्रवासी व जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहनांच्या मोठ्या लांबलचक रांगा लागल्या असून मोठ्या दुर्घटनेला जणू काही निमंत्रणच दिल्यासारखी स्थिती पाचवड फाटा ते उडतारे पर्यंतच्या परिसरात निर्माण झालेली आहे. ‘न्हाय’चा असाही ‘अर्धवट’पणासहापदरीकरणाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीला सुरूर येथील उड्डाणपुलाचे काम ठेकेदारांनी सुरू केले. हे काम अजूनही अपूर्ण आहे. कहर म्हणजे हा अर्धवट उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला असून पुलाच्या एकाच बाजूने दोन्ही बाजूची वाहने ये-जा करतात. ‘न्हाय’चा हा ‘अर्धवट’पणा प्रवाशांच्या जिवावर बेतत असून आजपर्यंत याठिकाणी छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही झालेल्या आहेत.