शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -कोल्हापूर शहरात नवे १३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 19:02 IST

corona virus Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाची लागण झालेल्या २८ नवीन रुग्णांची नोंद झाली; त्यांपैकी १३ रुग्ण हे कोल्हापूर शहरातील आहेत. या वाढत्या संख्येमुळे कोल्हापूर शहरात विशेष काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. सलग तिसऱ्या दिवशी मात्र एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, ही त्यातील दिलासादायक बाब आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात नवे १३ रुग्णकाळजीची गरज : एकूण २८ रुग्णांची नोंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाची लागण झालेल्या २८ नवीन रुग्णांची नोंद झाली; त्यांपैकी १३ रुग्ण हे कोल्हापूर शहरातील आहेत. या वाढत्या संख्येमुळे कोल्हापूर शहरात विशेष काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. सलग तिसऱ्या दिवशी मात्र एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, ही त्यातील दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात जेव्हापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तेव्हापासून कोल्हापूर शहरातील जास्त रुग्ण असल्याचे दिसत आहे.   आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे १९२ प्राप्त अहवालापैकी १५९ अहवाल निगेटिव्ह तर १३ अहवाल पॉझिटिव्ह (२० अहवाल नाकारण्यात आले). अ‍ॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे १२० प्राप्त अहवालापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह (२२ अहवाल नाकारण्यात आले).

खासगी रुग्णालये/लॅब मध्ये २६७  प्राप्त अहवालापैकी २५२ निगेटिव्ह तर १५ पॉझीटिव्ह असे एकुण २८ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकुण ५० हजार ५८१ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ४८  हजार ४५५ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण १ हजार ७४५ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३८१ इतकी आहे.

हातकणंगले, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, करवीर तालुक्यांत प्रत्येकी दोन तर पन्हाळा तालुक्यात एका रुग्णाची नोंद झाली आहे. नगरपालिका क्षेत्रातील दोन रुग्णांसह अन्य जिल्ह्यांतून दोन रुग्ण उपचारांसाठी आलेले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर