कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरला; पण दुपारनंतर पुन्हा रिपरिप सुरू राहिली. पावसामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून, काही ठिकाणी वाड्या-वस्त्यावर पोहचताना अडथळे येत आहेत. पंचगंगा, भोगावती, कासारी या नद्यांवरील १३ बंधारे पूर्णतहा पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीची पाणी पातळी २४ फुटांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांपेक्षा सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. सकाळी ११ वाजता तर कडकडीत ऊन पडले होते. दुपारी दोननंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ४७.५ मिलिमीटर झाला आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरण क्षेत्रात ५३, तर कुंभी परिसरात तब्बल ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ८१०, तर कासारी नदीतून २५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, पंचगंगेची पातळी २४ फुटांपर्यंत पोहोचली आहे. (प्रतिनिधी)धरणसाठा टीएमसीमध्ये -धरणाचे नाव आजचा साठा क्षमता पाऊस मिलिमीटरराधानगरी ५.३७ ८.३६१ ५३वारणा २८.२३ ३४.४० ३४दूधगंगा १३.६३ २५.३९ ३१कासारी २.२४ २.७७४ ४०कडवी १.९७ २.५१६ ३६कुंभी १.७१ २.७१५ ११२पाटगाव २.४५ ३.७१६ ४८चित्री १.०३ १.८८६ २२तालुकानिहाय झालेला पाऊसहातकणंगले - ६.९, शिरोळ - ०.७, पन्हाळा - २४.१, शाहूवाडी - २१, राधानगरी - १९.८, गगनबावडा - ४७.५, करवीर - १४.६, कागल - ६.८, गडहिंग्लज - १.७, भुदरगड - १४.८, आजरा - १२.३, चंदगड - ७.२.
१३ बंधारे पाण्याखाली
By admin | Updated: July 28, 2015 00:24 IST