कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी ७३, तर परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी ५१ अर्ज दाखल झाले आहेत. या पदांसाठीची स्थळ प्रत (हार्डकॉपी) जमा करण्याची मुदत सोमवारी संपली. कुलसचिव, परीक्षा मंडळ व मूल्यमापन मंडळ, निरंतर शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरचे संचालक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, आंतरविद्या शाखा, मानव्यशास्त्र शाखांचे अधिष्ठाता पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाकडून गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. या पदांसाठी एकूण पाचशे जणांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांनी स्थळ प्रत विद्यापीठात जमा करण्याची मुदत सोमवारपर्यंत होती. या मुदतीमध्ये कुलसचिवपदासाठी ७३ आणि परीक्षा मंडळाच्या संचालकपदासाठी ५१ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रशासनाकडून छाननीची प्रक्रिया होणार आहे.
120721\12kol_5_12072021_5.jpg
डमी (१२०७२०२१-कोल-स्टार ९१३ डमी)