शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाळूच्या किरळातून विषबाधा, सोनगेत बाळूमामांच्या बग्यातील १२ बकऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:46 IST

म्हाकवे : सोनगे (ता. कागल) येथे आदमापूर येथील बाळूमामांच्या बकऱ्यांनी शाळूचे किरळ खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन १२ बकऱ्यांचा मृत्यू झाला. ...

म्हाकवे : सोनगे (ता. कागल) येथे आदमापूर येथील बाळूमामांच्या बकऱ्यांनी शाळूचे किरळ खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन १२ बकऱ्यांचा मृत्यू झाला. २५ बकऱ्या अत्यवस्थ झाल्या होत्या.

जखमी बकऱ्यांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मगदूम, डॉ. रामदास पाटील, सूर्याजी आवळेकर यांनी तात्काळ उपचार केल्याने त्यांची प्रकृती स्थिर झाली असून, ती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी, संत बाळूमामाची बकरी येथील निपाणी राधानगरी रस्त्याशेजारी असलेल्या महादेव मजगे यांच्या शेतात सेवेकरी नागाप्पा मिरजे हे बकऱ्याचा कळप घेऊन मुक्कामाला आले होते. काल बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रानावनात फिरताना बकऱ्याच्या कळापातील सुमारे ४० बकऱ्यांनी शाळूचे किरळ खाल्ले होते. यामुळे विषबाधा होऊन बुधवारी रात्रीच १२ बकऱ्यांचा मृत्यू झाला.

हे सेवेकरी मिरजे यांच्या गुरुवारी सकाळी निदर्शनास आले. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मगदूम यांच्याशी संपर्क साधून अत्यवस्थ बनलेल्या बकऱ्यांवर उपचार करून घेतले. सध्या या बकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. मगदूम यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं